नांदेड जिल्ह्यात ‘आम्ही भारताचे लोक’ची जम्बो कार्यकारिणी जाहीर…
मारोती एडकेवार | नांदेड
‘आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य)’च्या नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण व शहर विभागाची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध तालुके, शहरे आणि ग्रामीण भाग चळवळीच्या संघटनात्मक प्रवाहाशी जोडण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
राज्य प्रसिद्धी व जनसंपर्क प्रमुख तथा नांदेड जिल्हा समन्वयक (प्रभारी) संघशिल भद्रे उर्फ एस. एन. नांदेडकर सर यासोबतच मुख्य समन्वयक संदेश शालिनी संभाजी कर्डक यांच्या सातत्यपूर्ण संपर्क, समन्वय आणि परिश्रमातून नांदेड जिल्ह्यातील संघटनात्मक रचना उभी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक स्तरावर जबाबदार पदाधिकारी नियुक्त करून चळवळीचे कार्य अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
तालुका व शहर स्तरावर नांदेड उत्तर साठी संजय खंदारे, नांदेड दक्षिणसाठी करण इंगोले, मुखेडसाठी संघर्ष भद्रे, कंधारसाठी धम्मदीप गायकवाड, लोहासाठी किशोर भावे, मुदखेडसाठी अशोक खिल्लारे, धर्माबादसाठी कुलदीप मस्के, देगलूरसाठी मंगलदीप सिताफुले, हदगावसाठी हर्षल औटे, हिमायतनगरसाठी विजय वाठोरे, अर्धापूरसाठी सिद्धार्थ सोनकांबळे, उमरीसाठी सुमेध तुरेराव, किनवटसाठी शिलरत्न पाटील, नायगावसाठी राहुल कांबळे, बिलोलीसाठी प्रतीक वाघमारे, भोकरसाठी प्रशांत हणमंते आणि माहूर साठी गुणवंत थोरात यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
जिल्हा स्तरावर संघशिल भद्रे उर्फ एस. एन. नांदेडकर सर हे जिल्हा समन्वयक (प्रभारी) म्हणून कार्यरत राहणार असून, जिल्हा संघटक प्रमुखपदी कुणाल गौतम लांडगे, महिला जिल्हा संघटक प्रमुखपदी सारिकाताई सावंत व रेखाताई पवार, दस्तऐवजीकरण प्रमुखपदी लक्ष्मण पांडुरंग वाघमारे, सांस्कृतिक उपक्रम प्रमुखपदी आनंद पंडित सर, शिस्तप्रमुखपदी भीमराव गंगाधर जोंधळे, प्रसिद्धी व जनसंपर्क प्रमुखपदी सम्राट नरवाडे व सुधाकर तुरे यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात उभारण्यात आलेली ही संघटनात्मक रचना महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठीही कार्यपद्धतीचा एक संदर्भ ठरू शकते. प्रत्येक जिल्ह्यातील तालुके, शहरे व ग्रामीण भाग चळवळीशी जोडून सक्रिय, जबाबदार आणि संविधानिक मूल्यांवर आधारित संघटनात्मक टीम उभारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे ‘आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ’ च्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.








