आम्ही भारताचे लोक , आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ, नाशिक जिल्हा, यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न .
बातमी सम्राट | नाशिक | प्रतिनिधी |
दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी जि. प. प्राथमिक शाळा, खडकवण, ता. कळवण, जि. नाशिक येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आवश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे व त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लावणे हा होता. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन प्रसन्न झाले.
या कार्यक्रमास कनाशी शिक्षण केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. वाघ साहेब, विशाल पहुरकर सर, आम्ही भारताचे लोकचे( राज्य संघटक), श्रीमती सुनंदा साबळे आम्ही भारताचे लोकच्या (राज्यस्तरीय स्पर्धा व उपक्रम प्रमुख), श्री. मच्छिंद्र ढेंगळे,(राज्य कोर कमिटीचे सदस्य) तसेच श्री. समर्थ व्यवहारे जिल्हा को-ऑर्डिनेटर एज्युकेशन डिपार्टमेंट) यांची उपस्थिती लाभली.
श्रीमती सुनंदा साबळे यांनी बहुजनांच्या महापुरुष व महामाता यांच्या कार्याची मुलांना थोडक्यात ओळख करून देऊन त्यांची तत्वे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात कशी पेरली याबद्दल सांगितले . विशाल सरांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व व त्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ देण्याचे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्य शिक्षकांनी यानंतर या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, शिक्षकांचे व गावकऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली .
“शिक्षणासाठी एक पाऊल… सामाजिक बांधिलकीसाठी एक हात!”








