शिक्षण महर्षी, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त भीमसृष्टी येथे अभिवादन …
बातमी सम्राट | रोहन सोनाळे | पिंपरी चिंचवड | दि.२३/०९/२६/
पिंपरी चिंचवड : शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ( भीमसृष्टी ) पिंपरी चिंचवड येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड येथील फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी पॅंथर नेते माजी .जिल्हा परिषद सदस्य दत्ताभाऊ गायकवाड , चित्रपट निर्माते एच. आर. शहा , बातमी सम्राट चे कार्यकारी संपादक सुनिल. एच. गायकवाड, तसेच युवा वादळ संघटनेचे प्रा. युवराज भास्कर तिकटे,
अशोक वानखेडे, सुभाष जाधव, गणेश सरवदे यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.








