माणसाने वैचारिक शुद्ध होऊन धम्म धारण करावा : डॉ एम एम भरणे..
आम्रपाली बुद्धविहारात इंजि डॉ एम एम भरणे यांचे प्रवचन
प्रवचन मालिकेतील भ.बुद्धाचा विशुद्धीमार्ग हे 2 रे पुष्प गुंफले
बातमी सम्राट | कुलदीप गायकवाड | मराठवाडा विभागीय प्रतिनिधी | दि.२५/०९/२६/ | संभाजीनगर |
आषाढ पौर्णिमे पासून बजाज नगर येथील आम्रपाली बुद्धविहारात वर्षावासा निमित भ बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन बौ विष्णू वाघमारे हे सा ठीक 6.30 वा दररोज करीत आहेत.भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा व शहर शाखा संभाजी नगरच्या वतीने महिला मंडळाने आयोजित केलेल्या या वर्षावास कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा परभणी जिल्हा अध्यक्ष इंजि डॉ एम एम भरणे, यांनी दि 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 भेट देऊन वर्षावास मालिकेतील *भ बुद्धाचा विशुद्धी मार्ग* या विषयावर मार्गदर्शन केले.बु्ध्द तत्वज्ञान हे केवळ पाठांतर करून चालत नाही तर त्या प्रमाणे आचरण करावे लागते.त्यासाठी प्रथम माणसाला वैचारिक शुद्ध व्हावे लागते.वैचरिक शुद्ध होण्यासाठी भ बुद्धाने खालील मार्ग सांगितला.मनातील मार,विकार,दैवीवाद, अंद्धश्रद्धा,रूढी परंपरा, बुवाबाजी,विषमता,भ्रामक संकल्पना, जातीभेद ,रागाग्नी,लोभाग्नी ,द्वेषाग्नी यांचा धिक्कार करुन माणसाला वैचारिक शुद्ध होता येते.माणूस वैचारिक शुद्ध झाला तरच त्याला सर्वांगीण विकास साधता येतो म्हणून माणसाने धम्म धारण करण्याचे आवाहन इंजि डॉ एम एम भरणे यांनी या वेळी केले..
प्रथम पाहुण्यांचे हस्ते भ बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्रीसरण व पंचशील घेण्यात आले.महिला मंडळाच्या वतीने पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आद बौ विष्णू वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा धानोरकरसर यांनी केले.
*भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद डॉ भीमरावजी आंबेडकर* यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात वर्षावास प्रवचन मालिका राबविण्यात येत आहे. विविध नगरात धम्माच्या विविध विषयांवर बौद्धाचार्य प्रवचन देत आहेत.या प्रसंगी धम्म श्रवणासाठी महिला मंडळाच्या रंजना कांबळे, गवईबाई, रामकला मेश्राम,इंदुमती पगारे, बेबीनंदा गवई, वैशाली हनवते,कल्पना पठारे, मीना कांबळे, उज्वला सरदार,कडुबाई, सुजाता धानोरकर, रूक्मिणी तुपे,शारदा वाघमारे, सुंदर भगत इत्यादी उपासक ,उपासिका बहुसंख्य उपस्थित होत्या शेवटी सरणतय घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.








