दुष्काळ यादीतून मुखेड गायब ..
छावा तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील शिंदे केरुरकर यांचा ४८ तासांत आंदोलनाचा इशारा.
बातमी सम्राट. | मनोज बिरादार | मुखेड तालुका प्रतिनिधी | दि.२६/०९/२६/
शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त यादी *Trigger-1* मध्ये छ. संभाजीनगर विभागातील नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांची नावे आहेत. (नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव).
परंतु प्रत्यक्षात *७२ पेक्षाही अधिक दुष्काळ* असतानाही मुखेड तालुक्याचे नाव या यादीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. याचा आम्ही *अखिल भारतीय छावा संघटनेच्या* वतीने जाहीर निषेध करतो, असे निवेदन तालुकाध्यक्षांनी दिले आहे.
अखिल भारतीय छावा संघटना, मुखेडचे तालुकाध्यक्ष मा. गिरीधर पाटील शिंदे केरुरकर यांनी दि. २६.०९.२०२६ रोजी मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय, मुखेड, जि. नांदेड यांना निवेदन दिले आहे.
*आमची मागणी :*
१) तात्काळ Trigger-1 च्या यादीत मुखेड तालुक्याचा समावेश करावा.
२) मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ दुष्काळी अनुदान, पीकविमा व चारा छावण्या सुरू कराव्यात.
*”जर ४८ तासाच्या आत मुखेड तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश न झाल्यास, यापुढे मुखेड तालुक्यात एकही मंत्र्याला फिरू देणार नाही, व तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील”*, असा कडक इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर गिरीधर पाटील शिंदे केरुरकर, साई पाटील मोरे, विनायक पाटील माहेगावकर, साई पाटील मोकसदरेकर आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.








