टाकळीभान मध्ये ४८ तासात दुसरी ऊस जळीत घटना : शेतकरी हवालदिल !
बातमी सम्राट | संदीप जाधव | टाकळी भान प्रतिनिधी | दि.२७/०९/२६/
या बाबत अधिक माहिती अशी की टाकळीभान मध्ये शेतकरी स्मिता सचिन मगर यांच्या ऊस पिकास शॉर्ट सर्किट मुळे आग लागून नुकसान होऊन 48 तास उलटत नाही तोच गट नंबर 101 मधील शेतकरी व संत सावता माळी सहकारी सोसायटीचे चेअरमन विलास आण्णासाहेब दाभाडे व प्रकाश रामचंद्र दाभाडे यांचे सुमारे दोन एकर ऊस पिकातून जाणाऱ्या मेनलाईन वर शॉर्ट सर्किट होऊन आग लागली व पूर्ण पीक त्यात असणाऱ्या ठिबक संच व पाईपलाईन सह आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक होऊन त्यांचे अपरिमित नुकसान झाले.बातमी समजताच ग्राममहसूल अधिकारी रुपाली रामटेके यांच्या सूचनेनुसार कोतवाल सदाशिव रणनवरे व संदीप जाधव यांनी पाहणी करून प्राथमिक अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला.ह्या वेळी उपस्थित असणारे वीज वितरण कंपनीचे श्री घोळवे साहेब व घुले यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले की आपल्या शेतीतून जर वीज वाहिनी जात असेल व त्याच्या आजूबाजूस झाडे किंवा फांद्या वाढल्या असेल तर त्या वेळेत छाटून वीज वाहिनी तारा मोकळ्या ठेवा ज्यामुळे अशे प्रकार घडण्या पासून वाचता येईल.








