जपान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय कबड्डी संघाची सुवर्ण कामगिरी..
टाकळीभानचा अष्टपैलू खेळाडू अस्लम इमानदार ची चमकदार कामगिरी !
बातमी सम्राट | टाकळीभान प्रतिनिधी | संदीप जाधव | दि.२७/०९/२६/
कब्बडी क्रीडा प्रकाराची पंढरी समजल्या जाणाऱ्या टाकलीभानचा सुपुत्र कु. अस्लम मुस्तफा इनामदार याने मोलाचे योगदान देऊन जपान येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारत देशाला सुवर्णपदक मिळवून दिले.आंतरराष्ट्रीय भारतीय कबड्डी संघात तो महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू होता.याआधी चायना येथे झालेल्या 2023 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय कबड्डी संघास सुवर्ण पदक मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा राहिला आहे. महाराष्ट्रातून सलग दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा आत्तापर्यंत अस्लम इनामदार हा महाराष्ट्रातील दुसरा खेळाडू तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिला खेळाडू ठरला आहे.आज झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय पुरुष संघाने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असणाऱ्या इराण संघाचा 40-34 असा पराभव नववे अजिंक्यपद जिंकले.तसेच सोनपे सुहागा उक्ती प्रमाणे भारतीय महिला संघाने सुद्धा इराणचा 37-34 असा पराभव करून सुवर्ण पदकास गवसणी घातली.








