- विद्यार्थी, महिला आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्राच्या घराघरात चळवळ पोहोचवणार : रश्मी प्रक्षाळे..
बातमी सम्राट | सुनिल एच गायकवाड | पुणे.| दि.२८/०९/२६/
पुणे : आम्ही भारतीयांचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीच्या राज्य महिला प्रमुखपदी रश्मी प्रक्षाळे यांची निवड करण्यात आली. तसेच राज्य युवा संघटक म्हणून अमोल रणपिसे, चेतन लिम्बेकर आणि प्रदीप पैठणकर यांची निवड झाली.
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुणे जिल्ह्याच्या वतीने मीरा सोनटक्के, ॲड. वर्षा घोडके आणि सुरेखा गवळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी रमाईपुत्र विठ्ठलदादा गायकवाड होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कोअर कमिटी सदस्य तथा पुणे जिल्हा समन्वयक ॲड. नितीन सर घोडके यांनी उपस्थित मान्यवर, नवनियुक्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
सत्काराला उत्तर देताना सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी राज्य युवा समन्वयक प्रशांत देठे, हरीश मोहिले, सतीश हातोले, प्रतीक इखारे, अमोल राजमाने, मुकुंदराव सूर्यवंशी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








