जळगाव जिल्ह्यातील १५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर..
बातमी सम्राट | चक्रधर महाले | भुसावळ तालुका प्रतिनिधी |
जळगाव जिल्ह्यात पावसाने दीर्घ दांडी मारल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यानंतर राज्यभरातून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणीच होत असताना राज्य सरकारने राज्यातील तब्बल 265 तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे. या महत्त्वाच्या निर्णयात जळगाव जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सर्व लोकप्रतिनिधींनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. आता शेतकऱ्यांना मिळणार विविध शासकीय सवलतींचा लाभ.केंद्र सरकारच्या दुष्काळ निकषानुसार जाहीर झालेल्या या दुष्काळामुळे जळगाव जिल्ह्यासह राज्याचे शेतकऱ्यांना कर्ज वसुली स्थगिती, वीज बिलात सवलत, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफी,रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाची तीव्रता वाढवणे या सर्व विविध शासकीय सवलती आणि आर्थिक मदतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.








