बोदवड तालुका दुष्काळ पाहणी दौरा व आढावा बैठक…
बातमी सम्राट | चक्रधर महाले | भुसावळ प्रतिनिधी | दि.२८/०९/२६/
बोदवड तालुक्यात पावसा अभावी शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनाम्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी दिल्या. बोदवड तालुक्यात या वर्षी खूप अत्यल्प पाऊस झाला असल्यामुळे 100% दुष्काळ जाहीर होईल असे आश्वासन पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी दिले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहित आमदार चंद्रकांत भाऊ पाटील , स्विय्य सहाय्यक नवलसिंग पाटील , जिल्हा कृषी अधिकारी कुरबान तडवी , प्रांताधिकारी जितेंद्र पाटील , तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे , यांच्या समवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते..








