लक्ष्मण घुगे, राजापूर प्रतिनिधी
येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात पिकांची परिस्थिती ही एकदम बिकट असल्याने निसर्गाने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेल्या घास हिरावला गेला आहे शेतकऱ्यांनी केलेला खर्च सुद्धा मिळणार नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे शासनाने शेतकऱ्यांना योग्य अशी मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.
राजापूरसह पंचक्रोशीतील पिकांची परिस्थिती ही बिकट असून तालुका हा दुष्काळी असून पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, मजुरांना हाताला कामे नाही, आठ ते नऊ महिने काढणार, असा प्रश्न उद्भवला असल्याने शेतकरी सह मजूर वर्ग संकटात सापडले आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असला तरी यावर्षी शेतकऱ्याचे संपूर्ण पिक वाया गेले असल्याने शेतकऱ्यांना आता कसे जीवन जगावे असा प्रश्न पडला आहे संसाराचा गाडा चालविताना कसा चालावा असा प्रश्न शेतकऱ्यांचे मजुरांना पडला आहे त्यात जनावरांना अन्न पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने शेतकरीवर्ग धास्तवले आहेत
नाशिक जिल्हा व मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या येवला तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला असून येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील राजापूर ममदापूर खरवंडी देवदरी सोमठाण जोश भुलेगाव देवठाण या भागात पिके करपून गेली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे.
राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा असून सरकारच्या वतीने सरसकट कर्जमाफी केली पाहिजे असं मत मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केलं राजापूर परिसरात शेतकऱ्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे चारा छावणी तसेच पिण्याच्या पाण्याचे टँकर त्वरित सुरू करावे अशी मागणी याप्रसंगी शेतकऱ्यांनी केली.








