मुखेड तालुक्याला दुष्काळातून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप: तीव्र रास्ता रोको…
Trigger-1 मध्ये समावेश होईपर्यंत लढा सुरूच राहणार – दिलीप पाटील बेटमोगरेकर.
मुखेड तालुका प्रतिनिधी
मुखेड तालुक्याला दुष्काळातून वगळल्याचा शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. आज रस्त्यावर उतरलेले शेतकरी हे केवळ एका आवाहनावर आलेले आहेत. जोपर्यंत मुखेड तालुक्याचा Trigger-1 दुष्काळ यादीमध्ये समावेश होत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, अशी आक्रमक भूमिका आजच्या तीव्र रास्ता रोको आंदोलनातून व्यक्त करण्यात आली.
आजच्या रास्ता रोको आंदोलनातून मा. जि. प. अध्यक्ष *दिलीप पाटील बेटमोगरेकर* यांनी पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.
ते म्हणाले, *सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण* करण्यात येईल. आणि ते करूनही मुखेड तालुक्याचा Trigger-1 दुष्काळामध्ये समावेश झाला नाही तर तालुक्यातील शेतकरी *जनावरे आणि मुला-बाळांसह तहसील कार्यालयासमोर मागण्या पूर्ण होईपर्यंत ठिय्या मांडणार* असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
या तीव्र रास्ता रोको आंदोलनाला विविध पक्षांचे नेते, विविध संघटना, कार्यकर्ते, चळवळीतील सहकारी मित्र आणि तालुक्यातील शेतकरी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी शासनाने तात्काळ मुखेड तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करून दुष्काळी अनुदान, पीकविमा आणि चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी केली आहे.








