आय आय टी मुंबईतील साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण तापले..
काँग्रेस SC विभागाने घेतली आक्रमक भूमिका, संगमनेर प्रांत अधिकारी यांना निवेदन !
संगमनेर (प्रतिनिधी) IIT मुंबई येथील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, या मागणीसाठी आज अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने प्रांत अधिकारी संगमनेर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष बंटी यादव, पँथर माणिकराव यादव, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत थोरात, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विनोद गायकवाड, तालुकाध्यक्ष अशोक शेळके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
IIT मुंबईसारख्या प्रतिष्ठित संस्थेत दलित विद्यार्थ्याला जातीय शिवीगाळ व मानसिक छळाला सामोरे जावे लागल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. केवळ माफी आणि एका प्राध्यापकाच्या निलंबनाने हा विषय संपणार नाही, दोषींवर कठोर कारवाई करून कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.








