सर्जेराव बाळासाहेब मुसळे मुख्याध्यापक यांचा सेवा सेवापूर्ती सोहळा संपन्न…
म्हैसगाव मध्ये आज मुख्याध्यापक मा.सर्जेराव बाळासाहेब मुसळे यांनी 35 वर्ष सेवापूर्ती केली शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करून आज सेवा पूर्ण झाल्याने त्यांचा गौरव समारंभ म्हैसगाव पंचक्रोशीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता विशेष.मा संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक खा.प्रसादराव तनपुरे साहेब,आमदार प्राजक्तदादा तनपुरे साहेब यांच्या उपस्थितीत म्हैसगाव स्कूल कमिटी चे अध्यक्ष विलासराव गागरे,शाळा व्यवस्थापन समितीचे महाधु हुलुळेसर, और कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बापूसाहेब गागरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गहीनिनाथ हुळुले,सरपंच शिवाजी बर्डे, उपसरपंच भिमाशंकर दुधाट, निर्भय युवा ग्रामीण पत्रकार समाजकार्य संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कर्डे सर, डॉ शशिकांत गागरे, नानासाहेब विधाटे, सुनिल गुलदगड, संतोष माने सर, संभाजी माने सर, गंगाधर काकडे,पेरने सर,कनसे सर, विठ्ठल काकडे सर, डॉ अभि मुसुळे, डॉ. वृषाली दहातोंडे मेडिकल ऑफिसर म्हैसगाव, तसेच डॉ विनिता काकडे, वरिल मान्यवरांनी यांनी मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक सर्जेराव मुसुळे सर केदारेश्वर माध्यमिक विद्यालय म्हैसगाव स्थापन करण्यापासून ते आज प्रदीर्घ सेवा वेगवेगळ्या शाळेमध्ये निभावून आज 35 वर्ष सेवेचा कालखंड पूर्ती करून वयोमानानुसार शेवापूर्ती होत असल्याने आज म्हैसगावमधुन शैक्षणिक कामाची सुरुवात केली आणि म्हैसगावमध्ये मध्येच सेवा पूर्ण झाल्याने आज म्हैसगाव पंचक्रोशीला एक आगळा वेगळाच आनंद पाहायला मिळाला व मुसुळे सरांचा सत्कार समारंभ आजी-माजी विध्यार्थी तसेच अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये पदाधिकाऱ्यांनी मुसुळे सरांचा मानसन्मान पती-पत्नीचा गौरव करण्यात आला एक विशेष शेवापूर्ती म्हैस गावामध्ये च होत असल्याने एक म्हैसगाव पंचक्रोशीला एक अभिमान वाटला, मुसळे सरांनी म्हैसगाव मध्ये माध्यमिक विद्यालय नव्हते विद्यालय सुरू हवे म्हणून त्यांनी अनेक वर्ष विनामूल्य सेवा केले त्यानंतर आज केदारेश्वर विद्यालयाची वाटचाल अतिशय सुंदर इमारत तसेच ताईचा बोर्ड चालू झाल्याने आज सरांच्या कालावधीत शून्यातून सुरू झालेले वाटचाल आज म्हैसगाव गावकऱ्यांना माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी अनेक क्षेत्रांमध्ये नामवंत ठिकाणी गेलेल्या ने विद्यालयाचा अभिमान वाटतो एकमेव कारण मुसळे सरांनी 9192/93दशकात एकवेळ अनेक वर्ष समाज मंदिर चावडी पडक्या घरात म्हैसगाव मध्ये शाळा भरून अनेक वर्ष काढले अनेक भिंतीमधून विंचू साप निघत असे तरीपण सरांनी विद्यार्थ्यांना धीर देऊन शिकवण्याची धडे चालूच ठेवले, त्या कालखंडामध्ये सरांनी कुठेही एक रूप आहे मिळत नव्हता मोफत सेवा करत होते त्यांच्याबरोबर महादु हुळुले सर, विठ्ठल काकडे सर, गागरेसर, सर,ताठे सर यांनी काम केले, म्हैसगावात माध्यमिक शिक्षण सुरू व्हावा म्हणून सर्वात पुढे मुसळे सरांपासून सुरुवात झाली त्यांना गावातील मार्गदर्शक माननीय दिवंगत कै.नेते मच्छिंद्र गागरे पाटील,कै.राजेदेशमुख हांडे, त्या कालखंडांतील सहकार्यांनी दूरदृष्टीकोन ठेवून सरांना पाठबळ देत राहिले हायस्कूल बंद पडलय नाही पाहिजे. यासाठी प्रदीर्घ संघर्ष करावा लागला मान्यतेसाठी असेल त्यानंतर अनुदानासाठी असेल खूप संघर्षातून वाटचाल करत सरांनी आज सेवा प्रती करत असल्याने खरंच आज त्यांच्या सेवेचा गावकऱ्यांना वेगळाच आनंद मिळत आहे यापुढे ते नेहमी समाज कार्यामध्ये गावाला योगदान द्यावे असे युवकांच्यां भावना व्यक्त होत आहे. या कार्यक्रमासाठी अमृत तालुक्यातील अनेक शैक्षणिक संस्थेमधील शिक्षक व तसेच व पंचक्रोशीतील कोळेवाडी दरडगाव थडी शेरीचिखलठाण चिंचाळे, ताहाराबाद,वरशिंदे, गाडकवाडी,आग्रेवाडी तास,वनकुटे,या गावातील नागरिकांनी सरांचा पत्नी चां गौरव केला.








