महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी..
रोहन सोनाळे | पिंपरी चिंचवड विभाग प्रतिनिधी|
पिंपरी: महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शहरातील शाळांमध्ये विविध कार्यक्रम पार पडले .यावेळी प्रतिमा पूजन आणि भाषणे व स्वच्छता मोहीम ,बालसभा ,इत्यादी शिबिर घेण्यात आले.
*महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा मनपा*
चिंचवड स्टेशन येथील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयात राष्ट्रपती महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सरिता विधाते यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घातला .व इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी बालसभा घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी सौ नंदिनी खाडे यांनी आपले स्वच्छते विषयी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की,”स्वच्छतेविषयी लोकांची मानसिकता व विचार जोवर बदलणार नाही .तोवर स्वच्छतेची मोहीम यशस्वी होणार नाही. 1000 महात्मा गांधी जरी एकत्र आले तरी भारत स्वच्छ होणार नाही. मात्र सव्वाशे कोटी लोकांनी दृढ निश्चय दाखवला तर महात्मा गांधींचे स्वच्छ भारत होण्याचे स्वप्न सहज साकार होईल .पण स्वतःहून जर सुरुवात केली तर अस्वच्छतेला थाराच मिळणार नाही. असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी सुरेखा कुंजीर ,सुनीता नामदे, पुष्पा अहिरे, जयश्री इनामदार ,सविता देशपांडे, सीमा गजभिये तसेच शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
,*वाल्हेकर वाडी शाळा क्रमांक 18/1* चिंचवड वाल्हेकर वाडी मनपा शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले .यावेळी प्रभारी मुख्याध्यापिका सौ सुनीता पांढरकर ,मंगला ढवळे ,जया भोईटे, पद्मावती विभूते, श्री प्रवीण वैद्य, रत्नाकर गवारी बालवाडी शिक्षिका अनिता महाजन व गौरी कोल्हापुरे, शिक्षक, विद्यार्थी, व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता पाचवी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी केले. प्रस्ताविक श्री प्रवीण वैद्य यांनी तर आभार श्री रत्नाकर गवारी यांनी मानले.








