आँगन का मिलन’ अभियानांतर्गत टेंभुर्णीतील अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान..
शहरातील सर्व २४ अंगणवाड्यांना डिजिटल वजन काट्यांचे वाटप
अमोल मदने | माढा तालुका प्रतिनिधी |
टेंभुर्णी(प्रतिनिधी) प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात ‘आँगन का मिलन’ अभियान राबविण्यात येत असून, ‘सेवा हाच संकल्प’ या भावनेतून टेंभुर्णी येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत टेंभुर्णी तसेच भारतीय जनता पार्टी माढा पश्चिम मंडलाच्या वतीने टेंभुर्णी शहरातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस भगिनींचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला.
अंगणवाडी सेविका व मदतनीस या बालकांच्या आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी टेंभुर्णी शहरातील सर्व २४ अंगणवाड्यांना डिजिटल वजन काट्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांचे वजन नियमितपणे व अचूक पद्धतीने नोंदविण्यास मदत होणार आहे.
यावेळी भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मा. सौ. रूपालीताई लट्टे, भाजप सोलापूर ग्रामीण पश्चिम महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष मा. सौ. सुरजाताई बोबडे, माढा पश्चिम मंडलाध्यक्ष मा. श्री. योगेश बोबडे, युवा मोर्चा अध्यक्ष मा. श्री. अक्षय ढवळे, महिला मोर्चा अध्यक्ष मा. सौ. धनश्रीताई ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच टेंभुर्णी ग्रामपंचायत अधिकारी संजय साळुंखे सह भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मा. सौ. उर्मिला बारबोले, टेंभुर्णी शहराध्यक्ष मा. सौ. सुवर्णा देशमुख, टेंभुर्णी शहर उपाध्यक्ष इनरवील क्लब प्रेसिडेंट मा. सौ. मिताली शहा, ग्रामपंचायत टेंभुर्णीचे उपसरपंच मा. श्री. सतीश नेवसे, ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. तुकाराम डोके, मा. श्री. सोमनाथ ताबे, मा. श्री. गौतम कांबळे, मा. श्री. सचिन होदाडे, देवाभाऊ फाउंडेशनचे सदस्य मा. श्री. औदुंबर भागवत, रेखा ढवळे पाटील,मा. सौ. अनिता लोंढे, मा. सौ. आरगडे यांच्यासह टेंभुर्णी शहरातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी व महिला नागरिक उपस्थित होते.
‘आँगन का मिलन’च्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस भगिनींचा सन्मान, संवाद आणि अंगणवाड्यांच्या गरजांची पूर्तता करण्याचा हा उपक्रम ‘सेवा हाच संकल्प’ या भावनेला अधोरेखित करणारा ठरला.








