टेंभुर्णी येथे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती व संवाद यात्रा सांगता सभा उत्साहात
बातमी सम्राट | अमोल मदने | माढा तालुका प्रतिनिधी | दि.०४/१०/२०२६/
जय मल्हार क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्याच्या वतीने आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित संवाद यात्रेचा सांगता समारंभ टेंभुर्णी येथे हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते मा. दौलतनाना उमाजी शितोळे होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अंकुशरावजी जाधव सर होते. प्रारंभी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अंकुशराव जाधव यांना जि.प. सदस्य करण्याची मागणी
यावेळी बोलताना दौलतनाना शितोळे म्हणाले, प्रदेशाध्यक्ष अंकुशराव जाधव यांना स्वीकृत जिल्हा परिषद सदस्य म्हणून संधी मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असून त्यावर मुख्यमंत्र्यांचा रिमार्क झाला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशीही याबाबत चर्चा झाली आहे. तसेच उमाजी भाऊ बोडरे यांना स्वीकृत पंचायत समिती सदस्य म्हणून संधी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
टेंभुर्णी शहरात विविध महापुरुषांचे पुतळे असून, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या राजे उमाजी नाईक यांचा भव्य पुतळा शासनाने टेंभुर्णीत उभारावा, अशी मागणीही त्यांनी केली.
आमदार संजयमामा शिंदे यांचे आश्वासन
यावेळी आमदार संजयमामा शिंदे म्हणाले, रामोशी समाजाच्या प्रश्नांसाठी आम्ही नेहमीच सक्रिय आहोत. दौलतनाना शितोळे यांनी मांडलेल्या मागण्यांसाठी शासन स्तरावर १०० टक्के प्रयत्न करू.
प्रदेशाध्यक्ष अंकुशराव जाधव यांनी सोलापूर जिल्ह्यातील रामोशी-बेरड समाजाच्या स्थानिक प्रश्नांसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली.
या सांगता सभेला सोलापूर जिल्ह्यासह विविध भागातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय पाटील, नागाभाऊ खटके, धन्यवाद बापू चव्हाण, सुनील काका जाधव, सागर जाधव, भारत आप्पा जाधव, राहुल मदने, बापूसाहेब बोडरे, गंगुताई नाईक, संतोष चव्हाण, धनंजय ढवळे, कल्याण भंडलकर, नीतूताई मदने यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








