काँग्रेसकडून ०३ उमेदवारांची यादी जाहीर.
अमरावती, पुणे, आणि नागपूर पदवीधर शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारांची घोषणा.
पी एन देशमुख. | अमरावती | दि.०४/१०/२०२६ /
. राज्याचे विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चा बांधणीला वेग दिला आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आघाडी घेत नागपूर पदवीधर पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदार संघासाठी आपल्या तीन उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यामुळे उमेदवारा वरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीनुसार, दोन विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे यामध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजीत वंजारी आणि पुणे शिक्षक मतदार संघातून जयंत आजगावकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे तर, अमरावती शिक्षक मतदार संघातून अपेक्षाप्रमाणे आदिवासी पोहरे यांच्या नावावर शिक्का मुहूर्त करून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे . पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या या निवडणूक साठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे मात्र काँग्रेसने सर्वात आधी आपल्या उमेदवारांची घोषणा करून या शर्यतीत आघाडी घेतली आहे. काँग्रेसच्या घोषणानंतर आता इतर प्रमुख राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची नावे कधी जाहीर करणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निवडणुकीचे संपूर्ण वेळ पत्रक. आधी सूचना जारी. २९, सप्टेंबर २०२६. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ०६ ऑक्टोंबर २०२६ अर्ज भरण्याची अंतिम तारीख ०७ ऑक्टोंबर २०२६ व अर्जाची छाननी ०७ ऑक्टोंबर २०२६. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ०९ ऑक्टोंबर २०२६ मतदानाची तारीख व वेळ २३ ऑक्टोंबर २०२६ आहे.








