अमरावती जिल्ह्यातील रत्नापूर तलाव मध्ये बुडून दोन मुलांचा मृत्यू…
मित्राच्या वाढदिवसासाठी फिरायला गेले होते .
पी एन देशमुख जिल्हा | प्रतिनिधी. अमरावती | दि.०४/१०/२०२६/
अमरावती जिल्ह्यातील भानखेड परिसरातील जंगल भागात भानखेड मुख्य मार्गापासून सुमारे अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रत्नापूर तलावात दोन मुले बुडाले ही घटना गुरुवारी 2 ऑक्टोंबर ला संध्याकाळी घडली शहरातील आठ ते नऊ मुले तलाव परिसरात फिरण्यासाठी गेली होती त्यापैकी दोघे तलावातील पाण्यात बुडाले घटनेची माहिती मिळताच मुलांचे नातेवाईक, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले दरम्यान दोन्ही मुलांचे मृतदेह नातेवाईक व बचा पथकाने गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास बाहेर काढले आहे. भावेश संतोष चव्हाण वय 17रा. ज्योती कॉलनी गोपाल नगर अमरावती आणि प्रवेश शैलेश कडू वय 17रा. किरण नगर अमरावती असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांचे नावे आहेत. प्रवेश व भावेश हे आपल्या काही मित्रासह गुरुवारी दुपारी रत्नापूर तलावात परिसरात फिरण्यासाठी गेले होते सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास भावेश आणि प्रवेश हे तलावातील पाण्यात बुडाले. तलावात पाणी अधिक असल्याने दोघांनाही बाहेर येता आले नाही दरम्यान घटनेची माहिती मिळतात तातडीने मुलांचे नातेवाईक तसेच पोलीस व बचाव पथकाने घटनास्थळी गाव घेतली नातेवाईकांनी भावेशला तर बचा पथकाने प्रवेशला तलावातील पाण्याचा शोध मोहीम राबवून गुरुवारी रात्री सुमारे सव्वा नऊ वाजता मृत देह बाहेर काढले. बडनेरा पोलीस घटनास्थळी दाखल असून ही माहिती मिळाल्यानंतर शहरापासून पाच ते सहा किलोमीटर असलेल्या या तलावाजवळ नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र सायंकाळच्या सुमारास दोघे अचानक पाण्यात बुडाले आणि दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.








