संगमनेर येथील दशक्रिया विधी घाटाचे लोकार्पण
राहता शहर प्रतिनिधी | हिना उबाळे | दि.०४/१०/२०२६/
संगमनेर येथील विधी घाटाचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयं संघाचे जेष्ठ नेते श्री. अशोकराव सराफ यांच्या उपस्थितीत संपन्न झाले संघाच्या स्वयंसेवक कै. पाठक कुटुंबियांच्या धर्मशाळेच्या जागेवर हा दशक्रिया विधी विकसित करण्यात आला असून, या कामासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून सुमारे 40 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
या सुविधेमुळे संगमनेर शहरातील नागरिकांची दीर्घ काळाची गरज पूर्ण होण्यास मदत होणार आहे. यावेळी तालुका संघचालक श्री. सुभाष कोतमिरे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार श्री अमोल खताळ. पुरोहित संघाचे अध्यक्ष श्री. भाऊ जाकडी, भाजपाचे अध्यक्ष सौ. पायल ताई ताजणे. नगरसेविका सौ. साक्षी सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. आबासाहेब थोरात यांच्या सहसंग परिवारातील कार्यकर्ते उपस्थित होते.
सामाजिक गरज लक्षात घेऊन उभारण्यात आलेले या दशक्रिया विधी घाटाचा संगमनेरकरांना उपयोग होईल अशी अपेक्षा आहे








