सहकाराच्या वाटचालीला नारीशक्ती ची नवी दिशा…
राहता शहर प्रतिनिधी | हिना उबाळे | दि.०४/१०/२०२६/
सहकार भारतीच्या वतीने शिर्डी येथे, नारीशक्ती आणि सहकारिता या संकल्पनेतून आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन झाले.
यावेळी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर. उदय जोशी, प्रदेशाध्यक्ष श्री. दत्ताराम चाळके, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. विद्याधर अनास्कर,. राष्ट्रीय महिला अध्यक्ष सौ. रेवती ताई शेंदुर्णी कर, प्रदेशाध्यक्ष वैशालीताई आवाडे, संघटन मंत्री श्री. संजय पाचपोर, उपाध्यक्ष श्री रवी काका बोरावके यांच्यासह राज्यभरातून आलेल्या महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिलांचा सहकार क्षेत्रातील वाढता सहभाग आणि नेतृत्वाची तयारी या संमेलनातून प्रकर्षाने जाणवली. महिलांचा सहकार क्षेत्रातील वाढता सहभागी निश्चित समाधानाची बाब आहे. बचत गट, सहकारी संस्था आणि विविध उद्योगाच्या माध्यमातून महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होत आहेत. यासहभागाला आणखी व्यापक स्वरूप देत महिलांना आर्थिक स्वावलंबना सोबतच निर्णय प्रक्रियेत आणि सहकार क्षेत्रातील नेतृत्वात अधिक संधी मिळणे आवश्यक आहे.
महिलांचा सहभाग हा सहकार क्षेत्राच्या भविष्यासाठीचा भक्कम आधार आहे असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
सहकाराच्या माध्यमातून गावातील महिलांना एकत्र आणून बचत गटांनी चळवळ अधिक प्रभावीपणे उभी करण्याची मोठी संधी आपल्यासमोर आहे. यासाठी सहकार भारतीने आधी पुढाकार घेऊन महिलांना प्रशिक्षण मार्गदर्शन आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नारीशक्तीला सहकाराची ताकद मिळण्यास ग्रामीण नार्थव्यवस्थेला निश्चितच नवी उभारी मिळू शकते असे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले








