संजय कांगणे यांचा सेवानिवृत्त बद्दल सत्कार…
बातमी सम्राट | लक्ष्मण घुगे | राजापूर प्रतिनिधी | दिनांक ०४/१०/२०२६/
येवला तालुक्यातील राजापूर येथील ज्ञानप्रकाश आश्रम शाळेतील मदतनीस संजय धनालाल कांगणे यांनी 27 वर्षे सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्ञानप्रकाश आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कोल्हे तर प्रमुख पाहुणे येवला तालुका पत्रकार संघाचे सरचिटणीस लक्ष्मण घुगे माजी सरपंच सुभाष वाघ, प्रमोद बोडके, समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेशवर दराडे, दत्ता सानप, माजी सभापती पोपटराव आव्हाड, परशराम दराडे, डॉक्टर सुधीर जाधवमाजी प्राचार्य पि के आव्हाड ज्ञानप्रकाश आश्रम शाळेचे मुख्याध्यापक दीपक जाधव पत्रकार सुदाम गाडेकर,समाधान चव्हाण, शरद वाघ, तुळशीराम विचू, शंकरराव अलगट, गोटु सागळे, जितेंद्र कागणे, रोहिणी सागळे, सिताराम दराडे, व गावातील ग्रामस्थ व पाहुणे होते. आलेल्या सर्व मान्यवरांनी व गावातील ग्रामस्थांनी संजय कांगणे यांनी ज्ञानप्रकाश आश्रम शाळेची सुरुवात झाल्यापासून त्यांनी राजापूर येथे नोकरी करण्यास प्रारंभ केला व 27 वर्षे सेवा करून सर्वांना बरोबर घेऊन आश्रम शाळेत चांगली सेवा करून गोर गरिबाचे विद्यार्थी घडवले आहेत व विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत केली आहेत. यावेळी आश्रम शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते व या कार्यक्रम यशस्वीते साठी निखिल कांगणे, सौरभ सौरभ कांगणे, चैतन्या कांगणे, यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कातोरे सर यांनी केले तर आभार वाकचौरे सर यांनी मांनले व त्यांना आश्रम शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले आलेल्या सर्व मान्यवरांसह पाहुणे व आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था सजय कागणे यानी केलेली होती.








