शिर्डी प्रतिनिधी : राजेंद्र दुनबळे
शिर्डी : 6 ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामसभेत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी पाणीपट्टी व घरपट्टी नियमित जमा करण्याबाबत आक्रमक भूमिका घेण्यात आली. नागरिकांनी करांचा भरणा वेळेवर करून ग्रामपंचायतीच्या विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
गेल्या पन्नास वर्षाच्या काळात सावळीविहीर गावात स्वच्छता मोहीम ही कोणी केली नसून माजी उपसरपंच स्वर्गीय विनायकराव आगलावे यांचे बंधू व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक सामाजिक कार्यकर्ते भारत आगलावे यांनी सामाजिक कामातून स्वच्छता मोहीम हाती घेऊन केलेल्या कामाबद्दल ग्रामसभेत सरपंच ओमेश जपे व ग्रामस्थ यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी सरपंच अशोकराव आगलावे यांचाही सत्कार करण्यात आला.
दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे पाणीपट्टी व घरपट्टी ग्रामपंचायत ने यावर्षी माफ करावी अशी भूमिका काही ग्रामस्थांची असताना पाणीपट्टी व घरपट्टी ही माफ करता येणार नाही ती वसूलच करून घ्यावी लागेल कारण ग्रामपंचायतचा दैनंदिनी कारभार हा वसुलीवरच चालू असतो यातून विकासात्मक कामे केली जातात असे मत ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुनील माळी यांनी सांगून वेळेवर व लवकरात लवकर पाणीपट्टी व घरपट्टी भरावी असे आव्हान यावेळी त्यांनी केले
शासकीयअतिक्रमणात राहणाऱ्या लोकांचा प्रश्न लवकरच सोडविण्यात येणार असल्याचे सरपंच ओमेश जपे यांनी सांगितले
गावाच्या विकासासाठी उपलब्ध असलेल्या सर्व शासकीय योजनांचा प्रभावीपणे उपयोग करून नियोजनबद्ध विकासकामे करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला.
गावातील सांडपाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सांडपाणी व्यवस्थेची सुविधा उपलब्ध करून देणे, नागरिकांना शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, तसेच पाईपलाईनची कामे करण्यावर भर देण्यात आला.
सावळी वीहीर परिसरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी विद्युत पोल तसेच हायमॅक्स दिवे बसविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यामुळे गावातील प्रमुख भागांमध्ये प्रकाश व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
गावातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न लक्षात घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र शेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच भटक्या कुत्र्यांसाठी भाकरी उपलब्ध करून देण्यासाठी दोन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यासाठी ग्रामपंचायत निधीतून तरतूद करण्याचे नियोजन करण्यात आले.
याशिवाय गावातील अंगणवाडी व शौचालय बांधकामासाठीही आवश्यक नियोजन करण्यात येणार आहे. ग्रामसभेत घेण्यात आलेल्या या निर्णयांमुळे गावातील मूलभूत सुविधा सुधारण्यास आणि विकासाला गती मिळण्यास मदत होणार आहे.
यावेळी अनेक नागरिकांचे प्रश्न ऐकून घेऊन त्यांना सरपंच ओमेश जपे व ग्रामसेवक कारले यांनी समाधानकारक उत्तरे दिली
सदर ग्रामसभेसाठी उपसरपंच दत्तात्रय आगलावे ग्रामसेवक कारले भाऊसाहेब विकास जपे गणेश आगलावे शांताराम जपे संजय जपे संतोष कसबे. जिजाबा आगलावे. विक्रम आगलावे . आरोग्य सेवक .आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते. ग्रामपंचायत कर्मचारी मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते








