एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प खेड फूरुस बीट अंतर्गत दस्तुरी सह्याद्री हायस्कूल मध्ये पोषण महा तसेच सेवा संकल्प अभियान, २०२६ हा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमासाठी मा. महिला व बालकल्याण सभापती सौ. मयुरी शिर्के, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय बिरवटकर, पंचायत समिती सदस्य श्री. संग्राम कदम, सौ. अपूर्वा जाधव, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ. दीपाली शिरीषकर, पर्यवेक्षिका देवता काटकर, दस्तुरी सह्याद्री हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रदीप घाणेकर सर तसेच बहुसंख्येने पालक विद्यार्थी हजर होते. ICDS सेवा निवृत्त कनिष्ट सहकारी सौ. सुप्रिया सावंत यांचा सत्कार करण्यात आला. सेवा निवृत्त पर्यवेक्षिका शोभा सावंत या ही उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमात विविध पाककृती मांडण्यात आल्या होत्या, तसेच विविध योजनांचे स्टॉल्स ठेवण्यात आले होते, त्याचप्रमाणे भव्य रांगोळ्या मधून विविध योजना मांडण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेमधून विविध पोषणाबाबत चित्रे साकारण्यात आली होती, फळसजावट, THR च्या विविध पाककृती मांडण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे विशेष म्हणजे पोषण परीने सर्वाचे लक्ष वेधले. सदर कार्यक्रमात सेवा संकल्प अभियान अंतर्गत विविध योजनांचे प्रत्यक्ष लाभ देऊन आशिर्वादाचे दिवे लावण्यात आले. प्रारंभ फाऊंडेशनच्या शिल्पा शिंदे उपस्थित होत्या. या फाऊंडेशन टीम एच आर रेसीपी साठी बक्षीसे देण्यात आली. सर्वांनी कामात योगदान दिले. अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मोलाचे सहकार्य केले.
Related Posts
Add A Comment








