मालेवाडा येथे प्रतीक सार्वजनिक वाचनालय, अभ्यासिका कक्षाचे थाटात उद्घाटन.
नागपूर विभाग विशेष प्रतिनिधी : प्रदीप कडबे भिवापूर :
तालुक्यातील मालेवाडा येथे दिनांक १५ आक्टॊबर२०२६ रोजी प्रतिक सार्वजनिक वाचनालय मालेवाडा ता. भिवापूर जिल्हा नागपूर यांच्या वतीने अभ्यासिका कक्षा चे उद्घाटन आणि भारत रत्न डॉ.ऐ.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन व पुस्तक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी रेखा इंगोले सरपंच ग्रापंचायत मालेवाडा यांच्या हस्ते अभ्यासिका कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच ग्रंथ प्रदशनी चे उद्घाटन सुरज येल्ले मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्रायमरी शाळा मालेवाडा यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित फुलचंद मेश्राम उपसरपंच मालेवाडा लव जनबंधू माजी नगराध्यक्ष नगर पंचायत भिवापूर इंदु गेडाम पोलीस पाटील मालेवाडा प्रमुख उपस्थिती सुनिल तायवाडे सचिव ग्रामपंचायत मालेवाडा त्रिंबक वेलादी तलाठी मालेवाडा मनोहर वानखेडे ग्रामपंचायत सदस्य भुमेश्वरी खोंडे शिक्षिका माधुरी इमाने शिक्षिका वर्षा कश्यप शिक्षिका शाळा मालेवाडा यांच्या उपस्थीत, तसेच वाचनालयाचे अध्यक्ष चिंतामण राउत यांनी प्रास्ताविक भाषण व आभार प्रदर्शन केले.अशा प्रकारे कार्यक्रमा सांगता करण्यात आली. मोठ्या संख्येने वाचक गावातील नागरिक उपस्थित होते.








