एक वर्ष पूर्ण होण्याआधीच तीन उल्लेखनीय कामगिरी; आग्रेवाडी-म्हैसगावच्या चिमुकलीची राष्ट्रीय स्तरावर दखल
म्हैसगाव. प्रतिनिधी. अनिकेत विधाटे
आग्रेवाडी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर : वयाच्या पहिल्याच वर्षात असामान्य कर्तृत्वाची छाप उमटवत आग्रेवाडी-म्हैसगाव येथील श्रीजा समीक्षा सोमनाथ आग्रे हिने आपल्या विलक्षण कामगिरीने संपूर्ण परिसराचा गौरव वाढविला आहे. एक वर्ष पूर्ण होण्याआधीच श्रीजाने तीन उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

श्रीजाने अत्यंत कमी वयात कोणत्याही व्यक्तीच्या आधाराशिवाय, पूर्णपणे स्वतःच्या क्षमतेवर जिने (Stairs) चढण्याची विलक्षण कामगिरी केली. कमी वयात सर्वात वेगाने जिने चढण्याच्या या कामगिरीची National Record म्हणून नोंद झाली असून, हा श्रीजाच्या कर्तृत्वातील सर्वात मोठा आणि अभिमानास्पद टप्पा ठरला आहे.
विशेष म्हणजे, वयाच्या अवघ्या १०व्या दिवशीच श्रीजाने १० सेकंद तालबद्ध हालचाली सादर केल्या होत्या. जन्मानंतर इतक्या कमी कालावधीत केलेल्या या असामान्य कामगिरीची National Book of Records मध्ये विशेष नोंद झाली. तसेच, अवघ्या टव्या महिन्यात अल्पवयात आधारासह ४ मिनिटांपेक्षा अधिक काळ सतत उभे राहण्याची उल्लेखनीय कामगिरी श्रीजाने केली. या कामगिरीबद्दल तिला Vision Wellness Foundation चा Visionary Award प्रदान करण्यात आला.
अशा प्रकारे एक वर्ष पूर्ण होण्याआधीच राष्ट्रीय विक्रमासह तीन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या श्रीजाने हे यश आग्रेवाडी-हैसगाव, राहुरी आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
तीन उल्लेखनीय कामगिरी • राष्ट्रीय स्तरावर दखल
१. जिने चढण्याची कामगिरी
कमी वयात कोणत्याही व्यक्तीच्या आधाराशिवाय, पूर्णपणे स्वतःच्या क्षमतेवर जिने चढण्याची विलक्षण कामगिरी. National Record म्हणून नोंद.
२. १०व्या दिवशीची कामगिरी
वयाच्या अवघ्या १०व्या दिवशीच १० सेकंद तालबद्ध हालचाली सादर केल्या. National Book of Records मध्ये विशेष नोंद.
३. नव्या महिन्यातील कामगिरी
अवघ्या टव्या महिन्यात अल्पवयात आधारासह ४ मिनिटांपेक्षा अधिक काळ सतत उभे राहण्याची उल्लेखनीय कामगिरी. Vision Wellness Foundation चा Visionary Award.
“चिमुकले वय, छोटासा प्रवास… पण कर्तृत्व मात्र मोठ्या इतिहासाची नांदी!”








