बीड प्रतिनिधी / दिनांक 11 ऑगस्ट : बीड : कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य महासचिव एस टी गायकवाड यांचे दिनांक ९ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले. ते गेल्या वर्षभरापासून एका दुर्धर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. खरंतर ही बातमी त्यांच्या मित्रपरिवार व कर्मचारी वर्गाला विश्वास न बसणारी आहे. त्यांच्या अचानक जाण्याने काष्ट्राईब महासंघ व फुले शाहू आंबेडकरी चळवळी ची खूप मोठी आणि झाली आहे असं म्हणावं लागेल. आणि कास्ट्राईब महासंघाचे एक निर्भिड, संघर्षदायी, पॅंथर नेतृत्व.. कास्ट्राईब चा पॅंथर च हरपला असं म्हणावं लागेल. गेल्या 40 वर्षांपासून एकच संघटनेत एकनिष्ठपणे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याच एकनिष्ठ काम ते गेल्या अनेक वर्षापासून करत होते. पक्षनिष्ठा व एकनिष्ठ पणा काय असतो तो त्यांच्या कडून शिकावं असं वाटतं.. कास्ट्राइब महासंघात काम करत असताना आपला कर्मचारी हा देखील आपल्या परिवारातील सदस्यच आहेत असं ते नेहमी म्हणत व कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ते रात्रंदिवस लढा देत राहायचे. आज त्यांच्या जाण्याने कास्ट्राईब महासंघ व त्यांच्या परिवाराची खूप मोठी हानी झाली आहे.
दि. 10 ऑगस्ट रोजी बीड येथील अंकुश नगर स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात कास्ट्राईब महासंघ व तमाम फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून व त्यांचा गायकवाड परिवाराच्या वतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महासंघाचे कर्मचारी पदाधिकारी व फुले शाहू आंबेडकरी विचारधारेतील विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कास्ट्राईब परिवार व गायकवाड परिवार व त्यांचे नातेवाईक व मित्र मंडळ यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा जलदान विधी दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या राहत्या घरी अंकुश नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्यानंतर त्यांचा परिवार, सुलभा गायकवाड, कुलदीप गायकवाड, कुंदन गायकवाड, शितल गायकवाड, नितुशा गायकवाड, नीलम गायकवाड,
तसेच बातमी सम्राट चे बीड जिल्हा संपादक कुलदीप गायकवाड यांचे ते वडील होते व बातमी सम्राट चे कार्यकारी संपादक सुनील गायकवाड यांचे ते चुलते होते. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. तसेच त्यांना बातमी सम्राट परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.








