तालुका प्रतिनिधी. अंबादास मुकटे माहूर
किनवट येथील निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन १३ ऑगस्ट रोजी किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमरावजी केराम यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार होते.
यावेळी मंचावर मान्यवर माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमानिवार, ज्येष्ठ पत्रकार शिवराज राघूमामा, साहेबराव पवार, माहूरचे उद्योजक रणजीत तेलेवार, गुरुस्वामी निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे माहूर तालुकाध्यक्ष अनिल माडपेलीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. पत्रकारांनी निर्भीड व परखड पत्रकारिता करून समाजातील शोषित व पीडितांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.
केवल कॉम्प्लेक्स येथे सुरू करण्यात आलेल्या या कार्यालयात नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारी घेऊन निर्धास्तपणे यावे, पत्रकार संघ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे तालुकाध्यक्ष मार्कंडेय सिरमवार यांनी सांगितले.
कार्यक्रमास किनवट व माहूर तालुक्यातील निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी तथा सदस्य आणि निर्भय समाजकार्य संघ कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. माहूरचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष अनिल माडपेलीवार, तालुका उपाध्यक्ष समाधान कांबळे, शहराध्यक्ष कुंदन तीवडकर, युवा आघाडीचे आदेश बेहेरे, अंबादास मुकटे, सुरेश राठोड, सादिक शेख, ज्ञानेश्वर गुज्जलवाड गजानन कारंजेवार धीरज मुळे गजानन जाधव यांची उपस्थिती होती








