म्हैसगावच्या आरोग्य केंद्रात झेंडावंदनाला ग्रामस्थांचा विरोध; दवाखाना सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी : अनिकेत विधाटे
म्हैसगाव: राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभाराबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, याच नाराजीचा निषेध म्हणून आरोग्य केंद्राच्या आवारात झालेल्या झेंडावंदनाला ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित राहिले नसल्याची घटना समोर आली आहे. गावातील इतर ठिकाणी झेंडावंदन करण्यात आले; मात्र आरोग्य केंद्राकडे ग्रामस्थांनी पाठ फिरवली.
म्हैसगाव येथे दि. २२ मे २०१८ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. वन विभागाने जागा उपलब्ध करून दिल्यानंतर कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या आरोग्य केंद्रातून गावकऱ्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र अनेक वर्षे उलटूनही आरोग्य केंद्रात अपेक्षित आरोग्य सेवा पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाली नाही त्यामुळे ग्रामस्थांची तक्रार करीत आहे.
आरोग्य केंद्रासाठी आवश्यक साधनसामग्री, औषधांचा पुरवठा, रुग्णवाहिका तसेच प्रसूतीसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.. तसेच नव्याने कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्यांना ही काही काम नाही फक्त पगारासाठी येत आहे असे दिसुन येत आहे , त्यांच्या निवासासाठी स्वतंत्र इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र कर्मचारी तेथे कुणी राहत पण नाही नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
गावात आरोग्य केंद्राची मोठी इमारत असूनही प्रत्यक्षात रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी जावे लागत आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप आहे. दवाखाना केवळ २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या राष्ट्रीय सणांच्या दिवशी झेंडावंदनासाठीच वापरला जात असल्याची टीका ग्रामस्थांनी केली.
“आरोग्य केंद्र बांधून अनेक वर्षे झाली, मात्र त्याचा गावकऱ्यांना अपेक्षित फायदा होतच नाही. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या इमारतीत सर्व आवश्यक सुविधा सुरू करून डॉक्टर, कर्मचारी, औषधे, साधनसामग्री आणि प्रसूतीची सुविधा उपलब्ध करून द्यावी,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आरोग्य केंद्राचा प्रत्यक्ष कारभार सुरू करून गावकऱ्यांना गावातच आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. झेंडावंदनाला अनुपस्थित राहून ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राच्या निष्क्रिय कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. हा दवाखाना फक्त देखावा झाला आहे एकही रुग्ण त्या ठिकाणी फिरला सुद्धा नाही मग या दवाखान्याचा उपयोग काय ही पूर्ण इमारत घुळ खात पडून आहे असे चालू राहिल इमारत पडू शकते असे ग्रामस्थचे मत आहे .








