ग्रामपंचायत घोटी अंतर्गत अंगणवाडी क्रमांक एक किंवा क्रमांक दोन मधे भरती झालेल्या मदतनीस पदाची चौकशी करा – सामाजिक कार्यकर्ते धर्मा भवरे
प्रतिनिधी I सतीश घुले
किनवट : एकात्मिक बाल विकास सेवा योजना सेवा योजना प्रकल्प किनवट उत्तर या कार्यालयाकडून सण 2025 ला जाहिरात प्रसिद्ध करून शासन निर्णय व परिपत्रकानुसार महसूल गाव घोटी येथील अंगणवाडी क्रमांक एक किंवा दोन दत्तनगर घोटी येथे एकूण तीन रिक्त जागा होत्या त्यामध्ये दोन पद अंगणवाडी सेविका व एक पद मदतनीस म्हणून भरती करण्यात आले यामध्ये अंगणवाडी क्रमांक एक ची मदतनीस ही गुणानू क्रमानुसार अंगणवाडी सेविका म्हणून निवड करण्यात आली व तिचे मदतनीस हे पद रिक्त झाले होते, या रिक्त मदतनीस पदाची किनवट येथील सीडीपी यांनी कुठल्याही प्रकारची जाहिरात प्रसिद्ध न करता गावातील धन दांडग्या व्यक्तीच्या सुनेस आर्थिक व्यवहार करून ही जागा भरल्याचा आरोप धर्मा विठ्ठल भवरे, सामाजिक कार्यकर्ते तथा उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांनी केली आहे अशा प्रकारची तक्रार त्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती किनवट यांच्याकडे केली असून त्या पत्राच्या प्रतिलिपी महिला व बाल विकास मंत्री मंत्रालय मुंबई, आयुक्त संचालक महिला व बालविकास आयुक्तालय पुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद नांदेड यांना ई-मेलद्वारे तक्रारीच्या प्रतिलिपी पाठवले आहेत.
सदरील अंगणवाडी मदतनीसची नियमबाह्य नेमणूक ही तात्काळ रद्द करून संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करावी अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल अशी प्रतिक्रिया तक्रारदारांनी दिलेली आहे.








