डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत देश आणि समाज घडावा
स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रतिपादन
परभणी l प्रतिनिधी
समाजात लोकशाही मूल्य रुजली पाहिजे या मधूनच संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समाज आणि देश घडावा असे प्रतिपादन स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर साकोरे यांनी केले.

धम्म मैत्री संवाद अभियान व आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचा सोहळा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी त्या बोलत होत्या.
स्वातंत्र्यदिनी परभणीत पहिल्यांदाच डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर एक हजार तिरंगी फुग्यांनी सजवण्यात आला होता.
प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास प्रथम नागरिक तथा महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख यांच्या हस्ते तिरंगी पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
आपण सर्वजण देशाचे जबाबदार नागरिक असून भारतीय संविधानाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करूया असे आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केले.
मान्यवरांच्या मनोगता नंतर मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय या संदेश फलकाचे बलून आकाशात सोडून सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, जिल्हा परिषद अध्यक्षा लताताई वाकळे, पो.नि विश्वजीत कासले,समाज कल्याण सभापती मनपा डॉ राजेश रणखांबे,सुरेश भुमरे ,गौतम मुंडे नगरसेवक बबलू घागरमाळे,गौतम दादा भराडे, सचिन पाचपुंजे यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संजय बगाटे, एम एम बरे, राजकुमार एंगडे, सुधाकर श्रीखंडे, ॲड सुमन उफाडे, सुदाम तुपसुंदरे पेंटर प्रमोद अंभोरे,गौतम पंडित, भूषण मोरे राहुल घनसावंत रवि वावळे मिलिंद पुंडगे, अनिल कुरवाडे समीर रोडे दीपक पंचांगे पोर्णिमा येंगडे, यांनी पुढाकार घेतला.








