आकारी पडीत जमिनीच्या प्रश्नावर शेतकऱ्यांशी संवाद
प्रतिनिधी ! हिना उबाळे
श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या आकारि पडीत जमिनी पुन्हा मिळाव्यात या मागणीसाठी शेतकरी नेते श्री. अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली हरेगाव येथे सुरू असलेल्या अन्न त्याग आंदोलन स्थळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली.

यावेळी आंदोलनात सहभागी सर्व शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या आणि भावना जाणून घेतल्या
महसूल मंत्री असताना आकारी पडित जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा संपूर्ण तपशील शेतकरी बांधवांना समजावून सांगितला.
तसेच सध्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर होण्यासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत व्यक्तिगत पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याची ग्वाही दिली
याबाबत महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ही पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या मागणीबाबत सकारात्मक पाठपुरावा करण्याची ग्वाही दिल्यानंतर शेतकरी बांधवांनी आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले.
शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी त्यांना मिळाव्यात यासाठी पुढील काळातही हा विषय प्राधान्याने हाताळून पाठपुरावा सुरू ठेवणार आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले








