मुखेडच्या जनता विद्यालयात गुणवंतांचा गौरव करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे
राजापूर : म.वि.प्र.समाज नाशिक संचलित जनता माध्य.व उच्च माध्य.विद्यालय मुखेड ता. येवला येथे गुणवंतांचा गौरव करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतमातेचा गौरव करून वंदे मातरम्,राष्ट्रगीत, ध्वजगीत,राज्यगीत,स्काऊट गाईड गीत या सर्व कार्यक्रमास मिळालेला प्रचंड प्रतिसाद हे स्वातंत्र्य दिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते.त्यासोबत विद्यार्थ्यांच्या कवायतीने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.मविप्रचे येवला तालुका मविप्र संचालक नंदकुमार बनकर यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात शालेय समितीचे अध्यक्ष विश्वासराव आहेर यांनी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजवंदन केले.स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजवंदन उच्च माध्य.समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गुंड यांनी केले.
ज्येष्ठ मविप्र सभासद परशराम शिंदे,सुनील आहेर,सुरेश आरोटे, कारभारी आहेर,शिवसेना नेते छगन आहेर, सरपंच पुष्पाताई वाघ,संजय पगार,दिलीप आहेर ,अनंता आहेर,किशोर आहेर,सुकदेव आहेर ,राजेंद्र घोटेकर,रामराव निकम,निवृत्त सैनिक विठ्ठल दराडे,सचिन वाघ,नानासाहेब आहेर, साहेबराव आहेर,प्रमोद आहेर,प्राचार्य महेंद्र भगत,पर्यवेक्षक संजय गोसावी, भगवान शिरापुरे, संतोष आहेर, राजेंद्र पगार,चंद्रकांत वाघ,विनायक आहेर,पोलिस पाटील मनोज आहेर, वसंतराव आहेर, ज्येष्ठ शिक्षक दिलीप खताळ, आप्पासाहेब बडवर, देविदास काळे, शुभांगी धरम, विजयकुमार दुकळे, काकाजी साताळकर, राजेंद्र बोराळे, बापूसाहेब वाघ, हेमलता पाटील, कौतिक पवार, अजित शिंदे, नितीन आव्हाड, उल्का लोकरे, आनंदा जाधव, भानुदास मगर, पांडुरंग जाधव, योगेश महाले, सविता बलकवडे, वसंत शिलावट, अनिता दुकळे, वंदना तांगडे, संजय भांगरे, रविंद्र आहिरे, सोमनाथ कारे, आकाश आहेर, शाम शिंदे, अहिल्याबाई शेळके, वर्षा बडवर, उज्वल पुराणिक, सागर घोटेकर, प्रा. स्नेहल काळे, प्रा. दिपक गोराडे, प्रा. महेश शिंदे, प्रा. सोनाली बोरनारे, प्रा. शितल साठे, बाळू निसाळ, यशवंत शिंदे, योगेश टीळे, प्रियंका कंक्राळे,शरद कवार, युनुस देशमुख, सुनील गांगुर्डे, राकेश अनभुले, योगेश गांगुर्डे, समाधान दुघड, सचिन शिंदे, नवनाथ माळी, सागर दुघड, पुष्पा म्हाळुंदे, मनिषा शेळके, अंकुश सानप आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी, मविप्र सभासद, पालक, माता उपस्थित होत्या. ध्वजवंदन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौतिक पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन आप्पासाहेब बडवर यांनी केले.
ग्रामपंचायत कार्यालय मुखेड येथे बक्षीस वितरण करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.10 वी,12 वीत प्रथम पाच विदयार्थी तसेच प्रत्येक इयत्तेमधील तुकडी मधील प्रथम तीन विदयार्थी,नवोदय,शिष्यवृत्ती, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्याना ट्रॉफी देण्यात आली. त्यासोबत विद्यालयातील सर्वोत्कृष्ट सेवक म्हणून शिपाई श्री. शरद कवार यांना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन आनंदा जाधव,सागर घोटेकर यांनी केले.अनुमोदन श्याम शिंदे यांनी दिले.यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटोखाली- मुखेड ता.येवला येथील जनता विद्यालयात गुणवंतांचा गौरव करून स्वातंत्र्य दिन साजरा करताना उपस्थित पदाधिकारी व मान्यवर.








