गणाधीश इंटरनॅशनल स्कूल व कॉलेजमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे
राजापूर: गणाधीश इंटरनॅशनल स्कूल राजापूर या विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी संस्थेचे बोर्ड ऑफ डायरेक्टर उज्वल धात्रक तसेच डॉ. सावन देवरे, हेल्थ कोच यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गणाधीश कॉलेजचे विभागप्रमुख अमोल सानप, गणाधीश स्कूलच्या विभागप्रमुख सौ. साधना धात्रक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणांमधून राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त केली. सिनियर वर्गातील विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादरीकरण केले, तसेच कब बुलबुल च्या विद्यार्थ्यांनी ड्रिल सादरीकरण केले व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी परेड सादर केले. विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांचे सुंदर गायन करून उपस्थितांची मने जिंकली.
त्याचप्रमाणे लक्षदीप करिअर अकॅडमी च्या अंतर्गत अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब प्रशिक्षण सर्व विद्यार्थ्यांसमोर करून दाखविले व त्याचाही विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली. संपूर्ण परिसरात ‘भारत माता की जय’ आणि देशभक्तीपर घोषणांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे संस्थापक दत्तात्रय जी. एफ. धात्रक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती जाधव यांनी केले.








