सावळी विहीर येथे गुरु आनंद ऋषी यांची 127 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी
प्रतिनिधी : राजेंद्र दुनबळे
शिर्डी : सावळीविहिर येथे जैन श्रावक संघाच्या वतीने गुरु आनंद ऋषी यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त भव्य पालखी व जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे.. सौ अनिता शांतीलाल लोढा यांचा मास 31 दिवस उपवास. पचकावणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सकाळी 7.30 वाजे दरम्यान वर्धमान जैन श्रावक संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन ज्ञान प्रभाजी सरल यांच्या उपस्थित संपन्न झाला याप्रसंगी संगपती माणिकचंद कोठारी. अध्यक्ष दिलीप शेठ
बाठिया यांच्यासह संघ अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालखी सोहळा हा जैन स्थानकापासून नगर मनमाड रोड ने शुभारंभ लॉन्स या ठिकाणी डीजे च्या साह्याने मोठ्या भक्ती भावाने वर्धमान महावीरांच्या जयघोषाने. भक्तिमय वातावरणात 9 वाजे दरम्यान पोहोचला. या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांना नाश्त्याची सोय करण्यात आली होती.
त्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. ज्ञान प्रभाजी सरल यांनी अध्यात्मिक प्रवचन देऊन सर्वांना मंत्रमुग्न केले. सौ अनिता लोढा यांचा पचकावणी कार्यक्रमात अभिनंदन पत्र देण्यात आले संघाच्या वतीने संघपती माणिकचंद कोठारी. अध्यक्ष दिलीप शेठ बाठिया उपाध्यक्ष विजय राज पिपाडा खजिनदार भरत संघवी पुनम कोठारी महेश पिपाडा रमेश डुंगरवाल प्रकाश गांधी माणक लोढा वैभव बाठिया यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी पुना लोणावळा श्रीरामपूर कोपरगाव मनमाड शिर्डी रुई निमगाव निघोज संगमनेर कडा राहता नाशिक जळगाव आधी ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते व महिला मंडळाच्या शितल संघवी बहुमंडळ अध्यक्ष तृप्ती बाठिया अशा कोठारी कल्पना
बाठिया छाया डुंगरवाल कल्पना लोढा संगीता पिपाडा सुनंदा कोठारी सुनंदा जोशी मीना गांधी उज्वला लोढा अर्चना लोढा मंगल कोठारी रूपाली लोढा मीना कोठारी कुसुम गांधी अभिजीतजी लोढा महेश पिपाडा वैभव बाठीया जोगेश लोढा प्रशांत कोठारी शांतीलाल लोढा नरेंद्र लोढा योगेश डोशी हर्षद कोठारी वैजंत बाठीया सागर बाठीया संदेश खाबिया महावीर गा़ंधी संघाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. शांतीलाल लोढा परिवाराकडून गौतम प्रसादाचा कार्यक्रम देण्यात आला होता.
कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्ष दिलीप शेठ बाठीया तर आभार भावना पिपाडा. वैभव बाठीया तृप्ती बाठीया यांनी संघाच्यावतीने मानले.








