राष्ट्रीय भारत एकता सन्मान पुरस्कार वितरण सोहळा २०२६ पुणे पत्रकार भवन येथे संपन्न
पुणे : १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या ८०व्या पवित्र्य वर्धापन दिनाचे औचित्य साधत संघर्ष चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य व झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय भारत एकता सन्मान पुरस्कार २०२६ पुणे येथील नवी पेठ पत्रकार भवन येथे संपन्न झाला.

देश हिताचा विचार करणारे देशासाठी विविध क्षेत्रात कार्य करणारे कार्यरत असणारे सर्व सामाजिक ,कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींचा यथोचित असा सन्मान प्रमुख पाहुणे शुभहस्ते मा. भरत कुंभार घातक कमांडर कारगिल योद्धा, मा. अजय थाप्पा गोरखा बटालियन कारगिल युद्धा प्रमुख पाहुणे मा. योगेश भाऊ धावडे गोल्डन मॅन महा. चॅम्पियन प्रमुख आकर्षण मा. स्वातीताई महाडिक पुणेकर लावणी नृत्यांगना, प्रमुख उपस्थिती शिवभक्त, साहित्यरत्न, डॉ.गणेश राऊत संघर्ष चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अखिल भारतीय छावा संघटना, सहसंपादक अजिंक्य महाराज न्यूज चैनल, लोकसेवक मा.कांताभाऊ राठोड झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष, युवा ग्रामीण पत्रकार संघ कार्यक्षेत्र ( संपूर्ण भारत) महाराष्ट्र प्रदेश सहसचिव , मानुस परिवार सामाजिक संस्था अध्यक्ष दुष्यंत राजे जगताप, पुणे शिवाजीनगर येथील रोकडोबा मंदिर देवस्थान चे ट्रस्टी तानाजी शिरोळे , सामाजिक कार्यकर्ते शेखर कोरडे, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चैनल चे संजय धर्म, गोपाळ भालेराव, हशराज पाटील, गणेश तारू संघर्ष चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रशांत महाजन व पदाधिकारी बातमी सम्राट पेपरचे संपादक सुनील गायकवाड, तसेच झेप फाउंडेशन पुणे चे कोषाध्यक्ष रमेश राठोड व पदाधिकारी उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते डॉ.नितीनकुमार शिंदे, डॉ .अर्चना जोशी, मा .संजय कारंडे डॉ. राकेश रामराजे ,डॉ. करण राठोड
संपादक मा.संतोष लांडे श्रीमती. शारदा सरोदे, प्रा.अमरदीप रामराजे, कुमारी. सीमा काशीकर मा. सचिन काष्टे, सौ. रूपाली जोशी, मा. कांताभाऊ राठोड वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार फ्रेम, मेडल, सन्मानपत्र, तिरंगा पट्टी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवर तसेच पुरस्काराथी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या पुरस्कर वितरण कार्यक्रमाचे आयोजन संघर्ष चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य व झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले. प्रशांत महाजन सर यांनी आभार प्रदर्शन केले..








