पत्रकार मारोती एडकेवार यांचा शाळेय साहित्य वाटप करून, चिमुकल्या विद्यार्थ्या सोबत वाढदिवस साजरा
आंगणवाडी, जि. प. शाळा, वाचनालय, पक्ष कार्यालय बिलोली येथे वाढदिवस साजरा
नांदेड : बिलोली तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा आमचे बातमी सम्राट नांदेड जिल्हा प्रतिनिधी पत्रकार व वंचित बहुजन आघाडीचे बिलोली तालुका सदस्य, पत्रकार मारोती एडकेवार यांचा वाढदिवस हिप्परगा थडी येथे,अंगणवाडी क्रमांक 1 येथील विद्यार्थी चिमुकले व हिप्परगा थडी अंगणवाडी क्रमांक, 2 येथील विद्यार्थी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, व डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभ्यासिका वाचनालय येथील, विद्यार्थी यांच्यासोबत खाऊ व शालेय साहित्य वाटप करून, वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, गेल्या अनेक वर्षापासून सत्यशोधक पत्रकार मारोती एडकेवार यांनी केक न कापता चिमुकल्या, विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करतात बिलोली, येथील वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयात सुद्धा त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष धम्मदीप गावंडे,पत्रकार राजेश अमेटवार,सामाजिक कार्यकर्ते गंगाधर एडकेवार, साहेबराव एडकेवार, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक सूर्यकांत गायकवाड सर,व शाळेच्या वतीने पत्रकार मारोती एडकेवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी, उपस्थित वारकरी संप्रदायाचे तालुकाध्यक्ष गंगाधर धनुरे पाटील व शिक्षक सचिन पाटील शेवाळकर, शिक्षका तेली मॅडम सगरोळीकर, चेअरमन मोहम्मद इनामदार, शिवाजी एडकेवार,राजू एडकेवार, गौस बाबुबेग इनामदार, उपस्थिती होते,तर आंगणवाडी शिक्षिका व डॉ आण्णा भाऊ साठे वाचनालयात, ग्रंथापाल राजू पिराजी आंजनिकर, अविनाश लघुळकर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थी सोबत हा वाढदिवस मोठया उत्सहात साजरा झाला.








