चालत्या कारला मागून कारची धडक एक ठार
प्रतिनिधी : अंबादास मुकटे
माहूर : जगदंबा विद्यालयाचे दिवंगत प्राचार्य नथुजी कलाने यांच्या पत्नी लक्ष्मीबाई कलाने यांना मुलांनी यवतमाळ येथे नियमित तपासणीसाठी घेऊन गेले होते परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावरील मौजे किन्ही येथे रस्ता खराब असल्याने कारला ब्रेक लावला असता मागून येणाऱ्या कारणे जबर धडक दिल्याने आत बसलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई कलाने वय 75 वर्षे या कारच्या बाहेर फेकल्या गेल्याने यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन्ही कारमधील सहा ते सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि 19 रोजी दुपारी 4.30 वाजता घडली आहे.
माहूर शहरातील नथुजी कलाने यांचा मोठा परिवार आहे वाईबाजार येथील पूजा मेडिकल चे संचालक सुनील कलाने व त्यांचे बंधू अनिल कलाने हे आपल्या चुलत भाऊ मनोज कलाने यांची कार क्रमांक MH15 HQ 3007 ने डॉक्टर चक्करवार यांच्या रुग्णालयातून नियमित तपासण्या करून परत येत असताना मौजे किन्ही येथे राष्ट्रीय महामार्ग बनविण्याचा राहिलेला असल्याने त्या ठिकाणी वाहनाचे वेग कमी करावा लागतो त्यामुळे त्यांनी वेग कमी केला असता मागून येणाऱ्या कारणे त्यांना जबर धडक दिली यामध्ये ते रस्त्याच्या बाजूला किन्ही गावातील नाल्यात फेकले गेले त्यामुळे लक्ष्मीबाई यांच्या जागीच मृत्यू झाला तर कार मधील सर्वजण गंभीर जखमी झाले तसेच मागच्या कारमधीलही सर्वजण गंभीर जखमी झाल्याने उपस्थित नागरिक गावकऱ्यांनी त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले जगदंबा विद्यालयातील दिवंगत नथुजी कलाने सर यांचा परिवार मनमिळाऊ असल्याने त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेने वाई बाजार माहूर सह परिसरातील गावात नातेवाईकात शोककळा पसरली आहे.








