स्वातंत्र्य दिनानिमित्त तथागत .टीव्ही. चॅनेल द्वारे आंबेडकरी काव्य-गझल मुशायरा उत्साहात कार्यक्रम संपन्न
स्वातंत्र्य दिनानिमित्त आंबेडकरी काव्य-गझल मुशायरा उत्साहात संपन्न
वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त कवी, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव
अमरावती : पी एन देशमुख
अमरावती : ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त तथागत टीव्ही चॅनल, अमरावती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘आंबेडकरी काव्य-गझल मुशायरा’ विविध सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात पार पडला. शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अजिंठा सभागृह, नक्षत्र महाविद्यालय परिसर, काँग्रेसनगर, अमरावती येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्यिक, सामाजिक व परिवर्तनवादी योगदानाला उजाळा देण्यात आला. आंबेडकरी विचार, सामाजिक समता, बंधुता, संविधानिक मूल्ये, परिवर्तन आणि सामाजिक न्याय हे विचार काव्य, गझल व गीतांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कमलजी राऊत (सामाजिक कार्यकर्ता, दानदाते) होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावतीचे सचिव प्राचार्य डॉ. कमलाकर पायस यांच्या हस्ते झाले.
मान्यवरांचा विशेष सन्मान
कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‘सत्कारमूर्ती’ म्हणून विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये कॅप्टन डी. सी. मोहन यांचा त्यांच्या हयातीत १९५६ साली केलेल्या कार्याच्या स्मरणार्थ गौरव करण्यात आला.
तसेच मा. पुंडलीकराव ना.देशमुख, (पी.एन.देशमुख) दैनिक कलम वीर,जिल्हा प्रतिनिधी तसेच चीफ ब्युरो, तथागत टीव्ही न्यूज चॅनल; भाई प्रफुल्ल मंदा श्रीधर, विभागीय समन्वयक, सृजन मराठी साहित्य परिषद तथा जिल्हाकार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती; सौ. रजनीताई धनंजयराव गुढदेकर, वीरपुत्र माता-पिता; मा. रामभाऊ भिमटे, उपासक तथा ग्रंथवाचक; नयन मोंडे, विदर्भ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई तथा उपसंपादक, दैनिक मतदार, अमरावती; अमोल उल्हास मनवर, महाराष्ट्र स्टेट वाईल्ड लाईफ फोटोग्राफी २०२६; सायली जुमळे, बाल रंगभूमी परिषद महाराष्ट्र; तसेच रत्नाकर सिरसाट, नाट्य दिग्दर्शक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्तींचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता, कलाक्षेत्रातील तसेच परिवर्तनवादी कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्तींच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. शिवा प्रधान, मा. महेंद्र भालेराव, मा. डॉ. धनराजजी चक्रे, मा. इंजि. मा. प्राचार्य डॉ. संजय खडसे, मा. सुरेंद्रजी घरडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सोमेश्वर मोहोड व मा. वंदना खोब्रागडे यांनी केले. प्रास्ताविक मा. अरुण वानखडे व मा. दिपकराव इंगळे यांनी केले, तर आभार सौ. सुनीता रायबोले व मा. बाबुराव छापाणी यांनी मानले. कार्यक्रमाची स्टेज सजावट डॉ. अविनाश गवई व संगीता बनसोड यांनी केली.
कवी संमेलन व आंबेडकरी काव्य-गझल मुशायऱ्याने रंगले दुसरे सत्र
दुपारी ३ वाजता कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात भव्य कवी संमेलन व आंबेडकरी काव्य-गझल मुशायरा आयोजित करण्यात आला. या सत्राच्या अध्यक्षस्थानी मा. प्रविण कांबळे (शब्दास्त्र प्रमुख) होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून मा. अविनाश गोंडाणे (विद्रोही) उपस्थित होते.
या कवी संमेलनात मा. अरुण वानखडे, मा. देवानंद पाटील, मा. पद्माकर मांडवधरे, मा. दिलीप शापा मोहन, मा. रामसाहेब चव्हाण यांच्यासह विविध भागांतून आलेले विशाल मोहोड, नर्गिस अली, श्री. न. डोंगरे, प्रा. अरुण बुंदेले, सुनीता मेश्राम, रिजवान शेख, पल्लवी मते, मयूर गायकवाड, प्रज्ञा घरडे, महादेव बागडे, प्रेरणा पांडे, अब्दुल समदं रजा, संध्या संभे, सुशांत मेश्राम, मधुभाऊ हिरेकर, प्रनोती शेंडे, रेखा राऊत, गोवर्धन रामटेके, सिद्धार्थ गोंडाने, उल्हास मनोहर (नागपूर), देवीलाल रौराळे, डॉ. अजय खडसे या कवी-गझलकारांनी आपल्या कविता, गझला व गीतांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला.
कवी-गझलकारांच्या प्रभावी आणि ओजस्वी सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. आंबेडकरी विचारधारा, सामाजिक समता, अन्यायाविरोधातील संघर्ष, संविधानिक मूल्ये आणि परिवर्तनाची भूमिका यांचा प्रभावी जागर या काव्य-गझल मुशायऱ्यातून घडून आला.
कवी संमेलनाचे संचालन पवन डोंगरे व सुनीता रायबोले यांनी केले, तर आभार शिलाताई बागडे यांनी मानले.
आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे परिश्रम कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तथागत टीव्ही चॅनलचे मुख्य संचालक अरुण वानखडे, संपादक दिलीप तायडे, उपसंपादक डॉ. अविनाश सवाई, महिला प्रमुख वंदना खोब्रागडे, जिल्हा महिला प्रमुख सुनीताताई रायबोले, जिल्हा संघटक बाबुराव छापाणी, डॉ. भन्ते संघपाल (जिवंक) प्रवक्ता, सोमेश्वर मोहोड बडनेरा प्रमुख, दीपक इंगळे (गायक) अम. ता. प्रमुख, पुंडलिकराव देशमुख चीफ ब्युरो, ऍड. किरण रगडे, मदन खंडारे नादगांव ख. प्रमुख, मनोहर इंगळे अमरावती प्रतिनिधी, रामभाऊ भीमटे अमरावती प्रतिनिधी, ईश्वर यादव कॅमेरा प्रमुख, राधाताई कांबळे शेगाव प्रतिनिधी, संगीता बनसोड कार्यालय प्रतिनिधी, मालतीताई मोहोड शहर प्रतिनिधी, उदयभान वाघमारे शहर प्रतिनिधी, गंगाधर सरदार शहर प्रतिनिधी, सुलोचना जामनिक महिला संघटक, शिलाताई बागडे शहर प्रतिनिधी, शंकूतला गुडधे शहर प्रतिनिधी, सीमाताई मेश्राम शहर प्रतिनिधी यांच्यासह आयोजन समितीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने अमरावती शहरातील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, लोककवी वामनदादा कर्डक यांच्या परिवर्तनवादी साहित्याचा जागर आणि आंबेडकरी काव्य-गझल परंपरेचा संगम घडवून आणणारा हा कार्यक्रम सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रासाठी संस्मरणीय ठरला.








