कोटी कोरनार पुलिया दुर्घटना प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल
प्रतिनिधी : चुन्नीलाल मोटघरे
गडचिरोली : अधीक्षक अभियंता यांना तात्काळ निलंबित करा. कंत्राटदार कंपनीवर गुन्हा नोंदकरून परवाना रद्द करा. अधीक्षक अभियंता यांनी 550 कोटींच्या कामात केलेल्या गैरव्यवहारप्रकरणी 5 ही कामांची चौकशी करून कठोर कारवाई करा. अधीक्षक अभियंता यांच्या संपत्तीची चौकशी करा.
या ठोस मागण्यांना घेऊन आजाद समाज पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, आदिवासी विकास युवा परिषद, बिरसा ब्रिगेडच्या वतीने तीव्र हल्लाबोल. जिल्ह्याधिकारी कार्यालयातच जोरदार घोषणाबाजी. जिल्ह्यातील विविध भागातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित..








