अटलजींच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी चिमूर नगरपरिषदेला निवेदन
प्रतिनिधी : समीर बल्की
चिमूर : माजी पंतप्रधान व भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या देशभक्तीपूर्ण कार्याची आणि राष्ट्रनिष्ठेची स्मृती सदैव जनतेच्या मनात राहावी, यासाठी चिमूर शहरातील सावजी भोजनालय, मेन रोड येथील स्व. अटलजी चौकात अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन सोहळ्यात या मागणीसंदर्भात नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले. स्मृतीदिन अभिवादन सोहळा समितीचे प्रमुख ज्ञानेश्वर नाना शिरभय्ये यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी हे निवेदन सादर केले.
यावेळी भाजपा कार्यकर्ते मनीष नाईक, अविनाश बावनकर, मांया नन्नावरे, मधुकर जांभूळकर, नन्नावरे दादा आदी उपस्थित होते.
नगराध्यक्ष गीता लिंगायत तसेच उपनगराध्यक्ष संजय नवघडे यांनी निवेदन स्वीकारले. स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
स्व. अटलजींचे राष्ट्रहिताचे विचार, साधी जीवनशैली, लोकशाहीवरील निष्ठा आणि देशसेवेचा आदर्श नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, यासाठी पुतळा उभारणीची मागणी करण्यात आली आहे.








