येवला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर
झाडांची छाटणी होत असताना देखील त्याच बाजूला झाडांची लागवड
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर ; झाडांची छाटणी होत असताना देखील त्याच बाजूला झाडांची लागवड
प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे
येवला (राजापूर): दि. २१ ऑगस्ट २०२६, तालुक्याला जोडणारा राज्य मार्ग क्रमांक २५ नांदगाव -येवला असून ह्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने २०२६ मध्ये वृक्षारोपणाची मोठी मोहीम हाती घेतली असून रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड केली जात आहे .परंतु ही लागवड चुकीची असून संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ रस्त्याची पाहणी करून पुढील होणारा खर्च टाळावा अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाला कारणे दाखवा नोटीस बाजावली जाईल शक्यता.

कारण येवला ते राजापूर पर्यांत रस्त्याच्या पुर्व बाजुला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने ३३ केव्ही विद्युत पुरवठा करणारी लाईन टाकली आहे .त्या लाईन खाली पुर्वीचे वृक्षारोपण झालेली मोठी झाडी असुन विद्युत वितरण कंपनीने ह्या झाडाचे शेंडे ,फांद्या त्या मेन लाईनला खेटत असुन विद्युत पुरवठ्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याने त्या जुन्या झाडांची शेवग्याची छाटणी मोठ्या प्रमाणात केली असतांनाच त्या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने वितरण कंपनीला कोणत्याही प्रकारची विचारपुस केली नसावी .कदाचीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ह्या राज्य मार्ग क्रमांक २५ ची साधारणपणे दोन ते तीन वर्षांत ह्या रस्त्याने फिरकले देखील नसतील कारण रस्त्याच्या पूर्वेला विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबांची लाईन व त्याखाली झाडांची छाटणी पहाता सार्वजनिक बांधकाम विभागाचे या कडील दुर्लक्ष वास्तव नजरेस पडते
कारण आत्ता नव्याने या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून वृक्षरोपण केली जात आहे ते पण या लाईटच्या खाली मग ही वृक्ष वाढणार का त्यांचीही याच पद्धतीने छाटणी होणार मग शासनाचा अर्थात जनतेचा पैसा पूर्णपणे वायाला जाण्याची चित्र दिसत असतांना तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या पुर्व बाजुला का पुन्हा झाडे लावत आहे.
पाहणी करून त्या ठिकाणी वृक्षारोपण करावा अशी ग्रामस्थांची मागणी विनाकारण वृक्षारोपण करायचे बिल लाटायचे हे धोरण खरोखर चुकीचे असून शासनाने या अशा जबाबदार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसान अंतर्गत जा विचारावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
येवला नांदगाव राज्य मार्ग क्रमांक २५ वर पूर्व बाजूला विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा असून त्या खालील झाडांची शेंड्यांची कत्तल दरवर्षी होत असताना त्या लाईन खाली नव्याने वृक्षारोपण चुकीचे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करून योग्य ठिकाणी वृक्षारोपण व संवर्धन करावी प्रसाद पाटील माजी सरपंच नगरसुल
नगरसुल: नगरसुल राजापूर रस्त्यावर झाडांच्या शेंड्यांची कत्तल तर दुसऱ्या बाजूला त्याच बाजूला वृक्षारोपण
छाया -भाऊलाल कुडके
नगरसुल : येवला तालुक्याला जोडणारा राज्य मार्ग क्रमांक २५ नांदगाव -येवला असून ह्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने २०२६ मध्ये वृक्षारोपणाची मोठी मोहीम हाती घेतली असून रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड केली जात आहे. परंतु ही लागवड चुकीची असून संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ रस्त्याची पाहणी करून पुढील होणारा खर्च टाळावा अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाला कारणे दाखवा नोटीस बाजावली जाईल शक्यता.कारण येवला ते राजापूर पर्यांत रस्त्याच्या पुर्व बाजुला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने ३३ केव्ही विद्युत पुरवठा करणारी लाईन टाकली आहे .त्या लाईन खाली पुर्वीचे वृक्षारोपण झालेली मोठी झाडी असुन विद्युत वितरण कंपनीने ह्या झाडाचे शेंडे ,फांद्या त्या मेन लाईनला खेटत असुन विद्युत पुरवठ्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याने त्या जुन्या झाडांची शेवग्याची छाटणी मोठ्या प्रमाणात केली असतांनाच त्या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने वितरण कंपनीला कोणत्याही प्रकारची विचारपुस केली नसावी .कदाचीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ह्या राज्य मार्ग क्रमांक २५ ची साधारणपणे दोन ते तीन वर्षांत ह्या रस्त्याने फिरकले देखील नसतील कारण रस्त्याच्या पूर्वेला विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबांची लाईन व त्याखाली झाडांची छाटणी पहाता सार्वजनिक बांधकाम विभागाचे या कडील दुर्लक्ष वास्तव नजरेस पडते. कारण आत्ता नव्याने या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून वृक्षरोपण केली जात आहे ते पण या लाईटच्या खाली मग ही वृक्ष वाढणार का त्यांचीही याच पद्धतीने छाटणी होणार मग शासनाचा अर्थात जनतेचा पैसा पूर्णपणे वायाला जाण्याची चित्र दिसत असतांना तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या पुर्व बाजुला का पुन्हा झाडे लावत आहे. पाहणी करून त्या ठिकाणी वृक्षारोपण करावा अशी ग्रामस्थांची मागणी विनाकारण वृक्षारोपण करायचे बिल लाटायचे हे धोरण खरोखर चुकीचे असून शासनाने या अशा जबाबदार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसान अंतर्गत जा विचारावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. येवला नांदगाव राज्य मार्ग क्रमांक २५ वर पूर्व बाजूला विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा असून त्या खालील झाडांची शेंड्यांची कत्तल दरवर्षी होत असताना त्या लाईन खाली नव्याने वृक्षारोपण चुकीचे तरी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करून योग्य ठिकाणी वृक्षारोपण व संवर्धन करावी
प्रसाद पाटील माजी सरपंच नगरसुल राजापूर रस्त्यावर झाडांच्या शेंड्यांची कत्तल तर दुसऱ्या बाजूला त्याच बाजूला वृक्षारोपण.








