कु. प्रणव गुडघे याची नाशिक विभाग स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड!
प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे
राजापूर : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था, नाशिक संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर, राजापूर विद्यालयातील इयत्ता दहावी ‘अ’ मधील विद्यार्थी कु. प्रणव प्रकाश गुडघे याने १७ वर्षांखालील गटात बलकवडे व्यायाम शाळा भगुर येथे संपन्न झालेल्या नाशिक जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कु. प्रणव प्रकाश गुडघे याची नाशिक विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याची ही निवड विद्यालयासाठी अत्यंत गौरवास्पद, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. कु. प्रणवच्या या उल्लेखनीय यशाबद्दल क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. कोंडाजी मामा आव्हाड, उपाध्यक्ष माननीय श्री. उदयजी घुगे, सरचिटणीस माननीय श्री. हेमंत आप्पा धात्रक, सहचिटणीस माननीय श्री. दिगंबर नाना गीते, सर्व विश्वस्त, पदाधिकारी व संचालक मंडळ, तसेच संस्थेचे संचालक व विद्यालयाचे पालक संचालक माननीय श्री. संपत भाऊ वाघ, संस्थेचे संचालक माननीय श्री. रमेश भाऊ वाघ, संस्थेचे शिक्षणाधिकारी माननीय श्री. ई. के. भाबड सर संस्थेचे शिक्षणाधिकारी माननीय श्री. जयवंत भाबड सर, सेवक संचालक माननीय श्री. विवेकभाऊ गामणे, शालेय व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक संघ, विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. गिते एस. एस, पर्यवेक्षक श्री. आर. बी. वाघ, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्री. दराडे बी. एस., विद्यालयातील सर्व ज्येष्ठ शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद, सर्व ग्रामस्थ आणि पालक यांनी कु. प्रणव गुडघे तसेच त्याला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री. विलास वाघ सर आणि श्री. योगेश कडाळे* यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
तसेच नाशिक विभागस्तरीय स्पर्धेसाठी कु. प्रणव प्रकाश गुडघे यास मनःपूर्वक शुभेच्छा!
त्याने यापुढेही उत्तुंग यश संपादन करून विद्यालयाचे, गावाचे आणि संस्थेचे नाव राज्य स्तरावर उज्ज्वल करावे, हीच सदिच्छा!








