महिन्यानंतरही आश्वासनाची पूर्तता नाही: आश्रम शाळा दिवंगाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास मंत्री सार्वें वर हक्क भंग आणावा लागेल -बच्चू कडू
अमरावती : पी.एन.देशमुख
आश्रम शाळेच्या परिस्थितीबद्दल मी स्वतः विधिमंडळात चर्चा केली असून मंत्री अतुल सावे यांनी मला शब्द दिला आहे की मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो. पण त्या गोष्टीला एक महिना झाला असून आता अतुल सावे यांच्यावरच हक्क भंग सादर काढावा लागेल अशी परिस्थिती आमच्या आली आहे आम्हाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नाही सत्यत राहून आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये असे शिवसेना नेते बच्चू कडू यांनी म्हटले आहे. बच्चू कडू म्हणाले की जातीपातीच्या राजकारणात अशा प्रमुख प्रश्नाकडे दुर्लक्ष होता कामा नये. मी पुन्हा एकदा माध्यमाच्या माध्यमातून अतुल साहेबांना विनंती करतो की दिवंग्याचे मानधन, वस्तीगृह, शाळा हे सर्व प्रश्न तुम्ही सोडवा.
अजित पवार असताना ते सांगत होते की ५ तारखेच्या आत जर मानधन झाले नाही तर मी वित्त सचिवांचे मानधन करणार नाही अजित पवार गेले आणि शब्दही गेला. आता कोणी शब्द देणारा मंत्री भेटतो का हे आम्ही शोधत आहे. आता कुणी शब्द देणारा मंत्री भेटते का, जातीपातीच्या आणि सत्तेच्या राजकारणात दिव्यांग्याचे मानधन वस्तीगृह आणि शाळे सारख्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होता कामा नये सत्तेत राहून आमच्यावरच सरकार विषयी विरोधात आंदोलन करण्याची वेळ आंदोलन आणू नये असेही बच्चू कडू शिवसेना नेते यांनी म्हटले आहे.
बच्चू कडू म्हणाले की कोणतीही संघटना एका माणसाच्या कुटुंबापूर्ती मर्यादित नसते अनेक लोकांनी त्यासाठी त्याग केलेला असतो हे उद्धव ठाकरे यांना समजत असेल शिवसेना प्रहार मध्ये विलन करण्याची वेळच येणार नाही शिवसेना शिवसेनेकडे वाघही कायम राहतील. बच्चू कडू म्हणाले की शिवसेना पक्ष आणि जिल्ह्याचा निकाल एकनाथ शिंदे च्या बाजूनेच लागेल आणि नाही लागला तरी एकनाथ शिंदे सक्षम आहे केवळ नाव आणि चिन्हावर सर्व काही होत नसते त्यामुळे चिंता करण्याची काही गरज नाही. बच्चू कडू म्हणाले की राज्यात काही गोष्टीबद्दल चिंतन करण्याची गरज आहे जर अत्याचार सारखा घटना वारंवार घडत असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे या घटना कशा रोखता येतील त्यासाठी प्लॅन तयार करणे गरजेचे आहे. झालेल्या घटना प्रकरणी तातडीने शिक्षा देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यासाठी नवीन नियम कायदे आणले पाहिजे. असेही बच्चू कडू म्हणाले.








