कमठाला गावातील वीज समस्या गावकरी व महावितरण कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सुरळीत
प्रतिनिधी : अंबादास मुकटे,
माहूर : कमठाला गावाला वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्राच्या (ट्रान्सफॉर्मर) बुशिंगमध्ये बिघाड झाल्याने गावातील वीजपुरवठा खंडित होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे गावकऱ्यांना रात्र अंधारात काढावी लागण्याची शक्यता निर्माण झाली होती.
ही बाब गावातील सुनील पाटील कऱ्हाळे व पत्रकार मारोती देवकते यांनी संबंधित लाईनमन भंडारे यांच्या निदर्शनास आणून दिली. माहिती मिळताच लाईनमन भंडारे यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांना बोलावून रोहित्राची पाहणी केली आणि दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेतले.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वेळ न दवडता आवश्यक दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या तत्परतेमुळे कमठाला गावावर ओढवलेला अंधाराचा धोका टळला असून गावातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
या दुरुस्तीच्या कामासाठी महावितरणचे लाईनमन भंडारे, योगेश कल्याणकर, मयूर दोनकलवार व राम चौधरी यांनी विशेष सहकार्य केले. तसेच गावातील सुनील पाटील कऱ्हाळे, पत्रकार मारोती देवकते, संदीप कऱ्हाळे व उमेश भोयर यांनीही सहकार्य केले.
गावकऱ्यांनी वीज समस्या महावितरणच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ दखल घेत दुरुस्तीचे काम पूर्ण केल्याबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. गावकरी आणि महावितरण कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे वीजपुरवठा लवकर सुरळीत झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.








