धनगरवाडी येथे 169 वा अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न
प्रतिनिधी : हिना उबाळे
राहता तालुक्यातील धनगरवाडी येथे महंत गंगागिरीजी महाराज महाराज यांच्या 169 वा अखंड हरिनाम सप्ताहात पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित राहून महंत रामगिरीजी महाराज यांचे आशिर्वाद घेतले ,सप्तानिमित परिसरात निर्माण झालेल्या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेताना लाखो भाविकांची श्रद्धा आणि उत्साह जवळून पाहायला मिळाला.
यावळी महंत रामगिरीजी महाराज यांच्या समवेत सप्ताह स्थळी भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या पालकमंत्री वैद्यकीय कक्षास भेट देऊन तेथील पाहणी केली. दूरदूर वरून येणाऱ्या भाविकांना आवश्यकवैद्यकीय सुविधा वेळीत आणि योग्य पद्धतीने उपलब्ध व्हाव्या यासाठी करण्यात आलेल्या वैवस्तेची माहिती घेतली.
169 वर्षाची ही अखंड परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने पुढे सुरू आहे, हे या सप्ताहाचे मोठेपण आहे असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.








