ग्रां स.चे संपूर्ण पाच वर्षांचे मानधन गरजूंना वाटप करण्याचा संकल्प
शितलताई सोमनानी व गौरी सोमनानी यांनी समाजापुढे ठेवला आदर्श
प्रतिनिधी : चुन्नीलाल मोटघरे
गडचिरोली : वैरागड ग्रामपंचायत कार्यकाळातील सदस्याचा पाच वर्षांचा संपूर्ण मानधानाची रक्कम गरजू व गरजवंत समाजातील नागरिकांच्या मदतीसाठी अर्पन करण्याचा संकल्प ग्रामपंचायत सदस्या शितलताई भोलूभाऊ सोमनानी व गौरी सोमनानी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत जाहिर रित्या जाहिर केला .लोकप्रतिनिधीचे पद हे केवळ अधिकाराचे किंवा प्रतिष्ठेचे माध्यम नसून जनसेवेचे प्रभावी साधन आहे .याचा प्रेरणादायी आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
वैरागड ग्रामपंचायत सभागृहात आयोजित ग्रामसभेत शितलताई सोमनानी यांनी मार्गदर्शन करताना हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. लोकप्रतिनिधी म्हणून मिळणारे मानधन हे जनतेच्या सेवेसाठी उपयोगी पडावे या सामाजिक बांधिलकीतून त्यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील संपूर्ण मानधन गरजू समाजातील नागरिकांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की ,समाजात आजही अशी अनेक कुटुंब आर्थिक अडचणीचा सामना करीत आहेत .शिक्षण,आरोग्य ,उपजीविका किंवा इतर आवश्यक बाबीसाठी मदतीची गरज असलेल्या समाजातील नागरिकांना शक्य तेवढी मदत करणे हीच खरी लोकसेवा आहे .
लोकप्रतिनिधीचे पद आणि त्यातून मिळणारे मानधन हे जनतेच्या विश्वासामुळे मिळते. त्यामुळे त्यांचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी व्हावा. अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जनसेवेचा अनोखा संकल्प शितलताई सोमनानी आणि गौरी सोमनानी यांनी घेतले. या निर्णयामुळे ग्रामसभेत उपस्थित नागरिकांमध्ये कौतुकाची भावना निर्माण झाली.
ग्रामपंचायत सरपंच, पदाधिकारी , आणि ग्रामस्थांनी असताना त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे, निस्वार्थ सेवाभावाचे व संवेदनाशील भूमिकेचे अभिनंदन केले. सध्याच्या काळात लोकप्रतिनिधींनी वैयक्तिक हितापेक्षा समाज हितांना प्राधान्य द्यावे .अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यकाळातील संपूर्ण पाच वर्षाचे मानधन गरजूसाठी अर्पण करण्याचा निर्णय हा निश्चितच अनुकरणीय आणि समाजाला दिशा देण्याचा उपक्रम ठरला आहे. कृतीतून दिला सामाजिक संदेश लोकप्रतिनिधीना मिळणारे पद हे जनतेच्या सेवेसाठी असते .हा संदेश केवळ भाषणातून न देता प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करण्याचा प्रयत्न शीतलताई सोमनानी व गौरी सोमनानी यांनी केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे लोकप्रतिनिधींनी आणि समाज यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याबरोबरच इतर लोकप्रतिनिधींना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.जन सेवा हि खरी लोकसेवा हा संदेश आपल्या कृतीतून देण्याचा शितलाताई सोमनानी व गौरी सोमनानी यांच्या सामाजिक उपक्रमातून मिळाला आहे.








