बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी समोर यावं, मोठा भाऊ म्हणून मी आपल्या सोबत आहे आमदार भीमराव केराम यांची ग्वाही..!
“प्रगती लोकसंचालित साधन केंद्राची तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात”
प्रतिनिधी – मार्कंडेय सिरामवार
किनवट – महिला आर्थिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन अंगीकृत) अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास कार्यक्रम ‘नवतेजस्विनी’ योजना अंतर्गत प्रगती लोकसंचालित साधन केंद्र, किनवट यांची तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा गजानन महाराज मंगल कार्यालय, किनवट येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार श्री. भीमरावजी केराम साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचतगटांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुजाता विनोद ऐड्रालावर (नगराध्यक्ष, न.प.), श्री. आनंद खेत्रे (जिल्हा समन्वयक, माविम), श्री. आनंद मच्छेवार (माजी नगराध्यक्ष, न.प.), प्रशांत कोर्डे (नगरसेवक, न.प.) नीलकंठ कातले, बंटी फड यांची उपस्थिती होती.
तसेच सुकेशनी कपाटे, कमळताई देशमुख, विशाल श्रोते (तालुका समन्वयक, माविम), अझहर सिद्धीकी (लेखापाल), सहयोगिनी भारती झलके, भाग्यशली भगत, शिंदू लिंबेकर, रविता कार्लेवर, प्रतिभा पाटील, प्रभावती शेंडे यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी नवतेजस्विनी योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. आणि प्रगती लोकसंचलित साधन केंद्राच्या कार्यालया करिता जागा आणि निधी देण्याचे ही आश्वासन आमदार किरण साहेबांनी दिले.महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांना उद्योग, स्वयंरोजगार व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास महिला बचतगटांच्या पदाधिकारी व सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी प्रगती लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले.
महिलांच्या स्वावलंबनाचा संकल्प आणि नवतेजस्विनी योजनेच्या माध्यमातून विकासाची नवी दिशा देत ही वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली.








