भीमाच्या लेकरांकडून दहावी-बारावी गुणवंत लेकरांचा ऑनलाइन गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
प्रतिनिधी: समीर बल्की तालुका
चिमूर – दि. २१ ऑगस्ट २०२६ : भीमाची लेकरं ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने दहावी-बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा ऑनलाइन गुणगौरव सोहळा शुक्रवारी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संतोष पाटील (मुंबई) होते.
डॉ. बालाजी लातुरे, डॉ. एम. पी. सिंह (दिल्ली विद्यापीठ) आणि मुंबई दूरदर्शनचे उपसंचालक यतिश हाडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांवर समाधान न मानता उच्च शिक्षण, ज्ञान, कौशल्ये, वाचन, चिकित्सक विचार आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे मान्यवरांनी आवाहन केले.
यावेळी यश बरफे, मोक्षांक पाटील, श्रीया पाटील, अनुष्का लातुरे, तन्वी भीत्रे आणि आरुष पाझारे या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. नितीन चवरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जया वागदे-गजभिये यांनी केले, तर आभार डॉ. संजय रायबोले यांनी मानले.
विविध जिल्ह्यांतील विद्यार्थी, पालक, शिक्षक व पदाधिकारी मोठ्या संख्येने ऑनलाइन सहभागी झाले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरला. आर्गनाइजेशन चे अध्यक्ष डॉ दिलीप पाटील, कोषाध्यक्ष डॉ चंद्रमणि गजभिये, व सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सर्वाचे अभिनंदन व आभार माणून या प्रेरणादायक कार्यक्रमाला उपस्थित सर्व पालक वर्ग व निमंत्रित मान्यवरांचे आभार मानले.








