माहूर तालुक्यात विक्रीसाठी येत असलेला गुटख्याचा साठा जप्त
सहा लक्ष रुपयाचे वाहन दीड लक्ष रुपयाचा प्रतिबंधित गुटखा जप्त
सिंदखेड पोलिसांची जबर कारवाईने गुटखा माफियात खळबळ
प्रतिनिधी :अंबादास मुकटे
माहूर : किनवट तालुक्यात गुटखा माफियांनी डोके वर काढल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर सिंदखेड पोलिसांनी अवैध दारू गुटखा विक्रीविरुद्ध धडक कारवाया सुरू केल्याने माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या सारखणी येथील वनोऊपज तपासणी नाका येथे फिक्स पॉईंट वर वाहन तपासणी सुरू असताना एका वाहनात बसलेल्यांच्या हालचाली संशयास्प्द वाटल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता कारमध्ये प्रतिबंधक गुटखा आढळून आल्याने कारसह गुटखा जप्त करून चालक मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना दि 20 रोजी 7.00 वाजता घडली आहे
माहूर किनवट तालुक्यात कृपया पद्धतीने गुटखा विस्की सुरू असल्याची माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भेंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे सिंदखेड पोलिसांनी निरीक्षक संतोष जोंधळे रात्रंदिवस गस्ती घालत जबरी कारवाया करत असून दि 20 रोजी रात्री पेट्रोलिंग सह वाहन तपासणी मोहीम सुरू असताना वन विभागाच्या सारखणी येथील वनोऊपज तपासणी नाका येथे कार क्रमांक MH 29 CR 0155 मधील चालक मालकांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता यामध्ये प्रतिबंधित गुटखा बंदी असलेला सुगंधित मसाला ज्याची किंमत 1 लाख 40 हजार 700 रुपये तसेच कार किंमत 6 लाख रुपये असा एकूण 7 लक्ष 40 हजार 700 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून प्रफुल्ल यन्नावार निवृत्ती अल्लडवार दोघे राहणार पुसद जिल्हा यवतमाळ या दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे
माहूर सिंदखेड पोलीस ठाणे अंतर्गत गुटखा विक्री होत असल्याची चर्चा सुरू असताना माहूर तालुक्यात विक्रीसाठी घेत असलेला गुटखा पोलिसांनी पकडल्याने गुटखा माफियात दहशत पसरली आहे या कारवाईत सिंदखेड चे स पो नि संतोष जोंधळे यांचे सह पोहेका आकाश सावंत पोहेका लखुळे कदम कांबळे गजानन कुमरे प्रफुल्ल पवार यांचे सह पोलीस पुढील कारवाई करीत आहेत








